नवीमुंबईत बनले आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर, पंतप्रधान करणार लोकार्पण

या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ ऑक्टोबर रोजी या मंदिराचा दौरा केला होता. या मंदिराचा उद्घाटनाचा सोहळा ९ जानेवारीपासून सुरु झाला असून १५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होत आहे.

नवीमुंबईत बनले आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर, पंतप्रधान करणार लोकार्पण
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 6:30 PM

नवीमुंबईतील खार घर येथे आशियातील सर्वात दुसरे मोठ इस्कॉन मंदिर उभारले जात आहे. या मंदिराचा उद्घाटन सोहळा ९ जानेवारीपासून सुरु झाला असून तो १५ जानेवारीपर्यंत रंगणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी येत्या १५ जानेवारीला मुंबईत येणार आहेत. या मंदिराचे उभारणी नऊ एकरावर करण्यात आली आहे. संपूर्ण संगमरवरी पांढऱ्या शुभ्र दगडात हे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिराच्या सभागृहात भगवान श्रीकृष्णाच्या लीलांना थ्रीडी फोटोंच्या आधारे दाखविण्यात आले आहे. या सोहळ्याला भजन सम्राट अनुप जलोटा, अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासह अनेक माननीय पाहुणे उपस्थिती राहणार आहेत.

सिडकोने या मंदिरासाठी जागा उपलब्ध केली होती. त्यानंतर अडीच एकर जागेवर हे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसन्स ( इस्कॉन ) या भगवतगीतेचा प्रसार करणाऱ्या संस्थेने या मंदिराची उभारणी केली आहे. नवीमुंबईतीर खारघर सेक्टर २३ मध्ये हे मंदिर उभारण्यात आले असून या मंदिराची उभारणी करण्याास १२ वर्षे लागले आहेत. या मंदिराच्या उभारणीसाठी पांढऱ्या शुभ्र आणि तपकीरी रंगाच्या संगमरवरी दगडांचा वापर केला गेलेला आहे. या एक आठवडाभर धार्मिक अनुष्ठान चालणार असून यज्ञ आणि इतर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी सुरु झाली आहे. भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित या मंदिराचे नाव श्री श्री राधा मदन मोहन असे ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराचे येत्या १५ जानेवारीला उद्घाटन करणार आहेत. तसेच सांस्कृतिक सेंटर आणि वैदीक म्युझियमच्या कोनशिलेचे पूजन देखील करणार असल्याचे मंदिराचे ट्रस्टी आणि हेड डॉक्टर सूरदास प्रभू यांनी सांगितले.

जगभरात सुमारे ८०० इस्कॉन मंदिरे

दशावतार मंदिरातील अनेक दरवाजे किलोच्या चांदीपासून बनविले आहेत. दरवाजांवर गधा, शंख,चक्र आणि ध्वज सोनेरी प्रतिमा कोरण्यात आली आहे. या मंदिराची निर्मिती ग्लोरी ऑफ महाराष्ट्र योजनेअंतर्गत झाली आहे. इस्कॉन मंदिराचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या तीन मूर्ती, भारत आणि परदेशातील त्यांच्या अनुयायांच्या मूर्ती, त्यांचे प्रतिमा आणि त्यांचे ग्रंथ असलेले एक स्मारक बांधण्यात आले आहे. जगभरात सुमारे ८०० इस्कॉन मंदिरे आहेत, परंतु नवी मुंबईतील हे एकमेव मंदिर असेल जिथे इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद जी यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत दोनशे कोटी खर्च

आम्ही गीतेचा प्रसार करण्यासाठी दूरदूर पर्यंत जातो. तेथे भक्त आम्हा एक मंदिर उभारण्याची विनंती केली जाते. यानंतर सिडकोकडून जमीन घेण्याचे काम सुरु केले. मंदिराच्या उभारणीसाठी २०० ते ३०० कोटींचा खर्च आला आहे. त्यावेळी जमीन खरेदी करणे खूपच जोखमीचे काम होते. पैशांची उभारणी करावी लागली. त्यानंतर इस्कॉन मंदिराचे महाराज सूरदास महाराजांनी मंदिराचे काम सुरु केले. ३,५०० ते ४००० हजार कोटी रुपये जमीनीसाठी लागले. मंदिराच्या उभारणी लोकांची सहभाग खूप महत्वाचा आहे. मी सर्वांचा आभारी असल्याचे सूरदास महाराज यांनी म्हटले आहे.

मंदिर परिसरातील आकर्षक सुशोभिकरण

दशावतार मंदिराच्या समोर विशाल बाग असून त्यात कारंजात विद्युत रोषणाई केलेली आहे.

मुख्यमंदिर आणि त्याच्या छतावर कलाकृसर केली असून पांढरा, सोनेरी आणि गुलाबी रंगाचा वापर केला आहे.

आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊस – येथे देश- विदेशातून आलेल्या भक्तांना राहाता येणार आहे.

नौकानयनसाठी भव्य तलावाची निर्मिती केली असून भक्तांना बोटींगचा आनंद घेता येणार आहे.

वैदिक शिक्षणसाठी कॉलेज लायब्ररी – येथे वैद्यीक ग्रंथ आणि शिक्षणाचा अभ्यास करण्याची सोय आहे

विशाल प्रसादम हॉल – येथे भक्तांना प्रसादाचे वाटप केले जाईल

आयुर्वेदिक हिलींग सेंटर – येथे आयुर्वेद, योगाभ्यास आणि मंत्राभ्यास सारख्या कार्यक्रमाचे आयोजनाची सोय

शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट – येथे भगवान श्री कृष्णाचे आवडते भोजन भक्तांना दिले जाते.

या मंदिरात तीन हजार भक्तांना एकत्र बसण्याची व्यवस्था आहे – सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांसाठी

या मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित असतील.

अध्यात्मच्या क्षेत्रातील नवे केंद्र

हे मंदिर नवीमुंबई क्षेत्रातील अध्यात्मच्या क्षेत्रातील नवे केंद्र म्हणून उदयास येईल. पंतप्रधान नरेंद्र मोद यांच्या येण्याने आम्हाला आणखी ताकद मिळते. सध्याच्या वातावरणात सर्वांना याची गरज आहे. या मंदिराने लोक केवळ भक्ती आणि भगवान श्रीकृष्णाच्या शरण येतील असे नव्हे तर आपल्या अशांत मनाला शांत करण्यासाठी देखील येतील. सूरदास महाराज यांनी पुढे सांगितले की बांग्लादेशा इस्कॉन मंदिरावर जो भ्याड हल्ला केला त्याची आपण निंदा करीत आहोत असे सूरदास महाराज यांनी म्हटले आहे. बांग्लादेशा संदर्भातील भारताच्या धोरणाच्या धोरणांना त्यानी पाठींबा दर्शविला आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.