चंदीगड: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात चरणजीतसिंग चन्नी यांच्या नेतृत्वात नवं सरकार आल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्ते केलं जात आहे. सिद्धू यांचा आता पुढचा प्लॅन काय असेल? अशी चर्चाही रंगली असून सिद्धू यांच्या हालचालींकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं आहे. (Navjot singh sidhu resigns as punjab congress chief)
नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे हा राजीनामा पाठवला आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. परंतु, पंजाब काँग्रेसच्या वाढीसाठी मी कार्यरत राहील. काँग्रेसचा विकासाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही, असं सिद्धू यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं असलं तरी काँग्रेसमध्ये सक्रिय राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केल्याने ते काँग्रेसमध्येच राहणार असून पक्षांतर करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर आपल्याच पदरात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल असं सिद्धूंना वाटत होतं. मात्र, सिद्धूंकडे मुख्यमंत्रीपद आलं नाही. शिवाय नव्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले. मात्र, सिद्धूंकडे उपमुख्यमंत्रीपदही दिलं गेलं नाही. त्यामुळे ते नाराज होते. त्याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. तर काही सूत्रांच्या मते सिद्धू यांच्याकडे गृहमंत्रीपदाची धुरा जाऊ शकते, त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असावा, असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे दिल्लीत पोहोचले आहेत. ते दिल्लीत काँग्रेस नेत्यांऐवजी भाजप नेत्यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सिंग भेट घेणार असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेसला निवडणुकीत त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचंही सांगितलं जात आहे. (Navjot singh sidhu resigns as punjab congress chief)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 28 September 2021 https://t.co/og9l4pXrVs #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2021
संबंधित बातम्या:
देव देतो आणि कर्म नेतं, रात्रीतून 1448 कोटीचा मालक झाला, पण हातात दमडाही नाही, का?
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 24 तासात सापडले 18 हजार रुग्ण
(Navjot singh sidhu resigns as punjab congress chief)