Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है; राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी मौन सोडले

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर दोन मंत्र्यांसह तीन नेत्यांनीही राजीनामे दिले आहेत. (Navjot Singh Sidhu Statement)

उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है; राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी मौन सोडले
Navjot Singh Sidhu
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 12:14 PM

चंदीगड: काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर दोन मंत्र्यांसह तीन नेत्यांनीही राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी सिद्धू यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली. पण त्यातूनही काहीच तोडगा निघाला नाही. त्यानंतर पहिल्यांदाच सिद्धू यांनी मौन सोडलं आहे. पंजाबच्या हक्कासाठी आणि सत्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल, असं नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे. ‘उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है, अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है’, असा शेर म्हणत सिद्धू यांनी आपल्या खास शैलीत सूचक इशाराही दिला आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनाम्यानंतर ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर करून राजीनाम्यानंतरची मन की बात जाहीर केली आहे. माझी लढाई मुद्यांवर विचारांवर आहे. मी हक्काची लढाई लढतोय. त्यात मी तडजोड करणार नाही. मी हायकमांडची फसवणूक करत नाहीये, असं सिद्धू म्हणाले. ज्यांनी सुरक्षा घेतली, ते सुरक्षा रक्षक होऊ शकत नाहीत. मला पंजाबची प्रगती हवी. त्यात मी तडजोड करणार नाही, असंही ते त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नैतिकतेशी तडजोड करणार नाही

कोणत्याही परिस्थितीत मी नैतिकतेशी तडजोड करणार नाही. माझी कुणाविरोधात वैयक्तिक लढाई नाही. माझी लढाई मुद्द्यांवरची आहे. पंजाबच्या अजेंड्याची आहे. मला सिस्टिममधील गडबड मान्य नाही. सिस्टिममध्ये गडबड करणारेच राज्याचे रक्षक कसे होऊ शकतात? असा सवाल करतानाच मी सत्यासाठी लढत राहणार. हेच माझं वचन आहे, असं सिद्धू यांनी म्हटलं आहे.

पंजाबशी संबंधित विविध मुद्द्यांवर मी गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे. इथे पूर्वी कलंकित नेते आणि अधिकारी होते. त्याच प्रकारची व्यवस्था मला पुन्हा मान्य नाही. पंजाबच्या लोकांसाठी मी कोणत्याही गोष्टीचा त्याग करायला तयार आहे. मात्र, मी माझ्या सिद्धांतांवर ठाम आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

हायकमांडची दिशाभूल होऊ देणार नाही

पंजाबच्या लोकांचं जीवनमान उंचावं आणि मुद्द्यांवर आधारीत राजकारण करणं हाच माझा गेल्या 17 वर्षाच्या राजकारणातील उद्देश राहिला आहे. माझं आजपर्यंत कुणाशीही वैयक्तिक भांडण राहिलेलं नाही, असं सांगतानाच मी हायकमांडची दिशाभूल करू शकत नाही आणि कुणाला करूही देणार नाही. पंजाबच्या लोकांसाठी मी वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यासाठी मला काहीच विचार करायची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शेवटी त्यांनी आपल्या खास शैलीत भाष्यही केलं आहे.

संबंधित बातम्या:

सिद्धू विरुद्ध कॅप्टन : जेव्हा अझरुद्धीनसोबतच्या वादानंतर सिद्धूने इंग्लंड दौरा तडकाफडकी अर्धवट सोडला

पंजाबमध्ये राजकीय भूकंप! नवज्योत सिंह सिद्धूसह काँग्रेसच्या 5 नेत्यांचा राजीनामा

नाराज कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर, दिल्लीत नड्डा, शहांना भेटण्याची शक्यता, पंजाब काँग्रेसला मोठा झटका लागणार?

(Navjot Singh Sidhu shared new video said No personal rivalry with anyone in punjab congress)

औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल.
बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ
बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ.
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्..
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्...
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट.
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्...
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्....
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर...
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर....
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.