पवारांच्या UPA अध्यक्षपदावर नवनीत राणा म्हणतात एनिथिंग इज पॉसिबल!

राजकारणाच्या क्षेत्रात कोणी शरद पवारांचा हातही धरु शकत नाही, असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं.

पवारांच्या UPA अध्यक्षपदावर नवनीत राणा म्हणतात एनिथिंग इज पॉसिबल!
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 3:33 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यूपीएचे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) यांनी दिली आहे. (Navneet Kaur Rana talks on Sharad Pawar UPA President)

“आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करु शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सिनिअर नेते आहेत. आणि राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरु शकत नाही. त्यामुळे जे होईल ते शरद पवारांच्या इच्छेनुसार होईल.” असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं.

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार आहेत. मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचा गौरव करत मोदींना पाठिंबा दर्शवला आहे.

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीमागे काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. येत्या काही काळात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं स्वत: शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातला कित्ता दिल्लीतही गिरवला जावा आणि केंद्रामधलं सरकार सत्तेच्या खाली खेचावं, हे सगळं प्लॅनिंग पवारांकडे देण्याचं नियोजन सोनिया गांधी यांचं असल्याचं बोललं गेलं. मात्र “या सगळ्या चर्चा आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही” असं दस्तुरखुद्द शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय वाटतं?

“आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने मी काम करत आहे, असं शरद पवार यांनी आधीच सांगितलं होतं. विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे, जनता कंटाळलेली आहे. मजूर, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे, त्यामुळे विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेने शरद पवारांचं काम सुरु आहे” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं. (Navneet Kaur Rana talks on Sharad Pawar UPA President)

राजकीय विश्लेषकांचं मत काय?

“महाराष्ट्रात भाजपची कोंडी केली, तसा प्रयोग देशातही होऊ शकतो. यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. पण त्यांचं वय आणि प्रकृती पाहता, आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत ते त्यांना झेपणारं नसेल. राहुल गांधी यांच्याकडे सूत्र देण्याऐवजी क्रमांक दोनवर ठेवणं पसंत केलं जाईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कार्यक्षम आहेत. विरोधातील सर्वच पक्षांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांची राजकीय परिपक्वता, मास बेस, सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा पाहता शरद पवार हा योग्य पर्याय ठरेल. अमेरिकेच्या अध्यक्षपदी 78 वर्षांचे ज्यो बायडेन असतील, तर शरद पवार केंद्रीय पातळीवर नेतृत्वाची धुरा घेऊ शकतात, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

शरद पवार आधी यूपीएचे चेअरमन होणार, नंतर पंतप्रधान? कोण काय म्हणतंय?

पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?; समजून घ्या 12 पॉईंटमधून!

(Navneet Kaur Rana talks on Sharad Pawar UPA President)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....