Losabha Election 2024 : लोकसभा निवडणूक कुणाला जड जाणार? NDA की I.N.D.I.A.? ओपिनियन पोलचा निकाल काय सांगतो?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार? NDA की I.N.D.I.A. आघाडी? कोणाचे सरकार स्थापन करणार? याचा ओपिनियन पोलचा निकाल समोर आला आहे. पाच राज्यांच्या ओपिनियन पोल सर्व्हेमध्ये भाजपला 4 राज्यांमध्ये प्रचंड बहुमत मिळताना दिसत आहे.

Losabha Election 2024 : लोकसभा निवडणूक कुणाला जड जाणार? NDA की I.N.D.I.A.? ओपिनियन पोलचा निकाल काय सांगतो?
PM NARENDRA MODI Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 2:26 PM

नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : भाजप आणि काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि I.N.D.I.A काँग्रेससोबतची आघाडी यांच्यात प्रामुख्याने ही लढत होणार आहे. दरम्यान, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या जनमत चाचण्यांचे निकाल समोर आले आहेत. सी-व्होटरच्या ओपिनियन पोल सर्व्हेनुसार दक्षिण भारत हे भाजपसाठी मोठे आव्हान असेल. तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्याला भाजपची कामगिरी जोरदार दिसत आहे. तर, तेलंगणामध्ये कॉंग्रेसला यश मिळेल असे सी-व्होटरच्या ओपिनियन पोल सर्व्हे सांगत आहे.

कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील एकूण 110 जागांपैकी भाजपला 82 ते 92 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला १३ ते २३ आणि इतरांना ४ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तेलंगणात काँग्रेस तर कर्नाटकात भाजप

कॉंग्रेसची सतत असलेल्या तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांपैकी तेलंगणा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा वरचष्मा दिसत आहे. मात्र, कर्नाटकामध्ये भाजप मुन्स्डी मारेल असे दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला 38 टक्के तर भाजपला 21 टक्के मते मिळतील असे सांगण्यात येत आहे. सी व्होटरच्या सर्वेक्षणामध्ये भाजप कर्नाटकात काँग्रेसला मागे टाकत असल्याचे दिसत आहे. या दोन राज्यातील 45 जागांच्या हिशोबाने भाजप काँग्रेसपेक्षा सरस दिसत आहे. मात्र, गेल्या वेळच्या कामगिरीपेक्षा काँग्रेसच्या आताच्या कामगिरीत सुधारणा होताना दिसत आहे.

कर्नाटकमधील लोकसभेच्या एकूण 28 जागांपैकी भाजपला 22 ते 24 आणि काँग्रेस 4 ते 6 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे तेलंगणामधील एकूण 17 पैकी भाजपला 1 ते 3 तर कॉंग्रेसला 9 ते 11 जागा मिळतील. तर, BRS पक्षाला 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर 1 ते 2 जागा मिळतील असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती

छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली कामगिरी उंचावली आहे. त्याची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत होण्याची चिन्हे आहेत. सर्वेक्षणामध्ये भाजपला 11 पैकी 9 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 55 टक्के तर 37 टक्के मते काँग्रेसच्या खात्यात जात आहेत. इतरांना 8 टक्के मते मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये भाजपची जादू चालणार?

राजस्थानमधील लोकसभा निवडणुकीत भाजपची जादू चालेल अशी अपेक्षा आहे. सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपला 57 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काँग्रेसला 34 टक्के मते मिळतील असे सांगण्यात येत आहे. राजस्थानमध्ये लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. त्यापैकी भाजपला 23 ते 25 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. तर कॉंग्रसला ० ते २ जागा मिळतील असे सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेशमध्ये पुन्हा भाजप

मध्य प्रदेश लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. भाजपला येथे 58 टक्के तर काँग्रेसला 36 टक्के मतांवर समाधान मानावे लागू शकते. एकूण २९ जागांपैकी भाजप 27 ते 29 आणि कॉंग्रेसला ० ते २ जागा मिळतील असे या सर्व्हेमधून समोर आले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.