AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Droupadi Murmu : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू दिल्लीत, आज दुपारी 12 वाजेनंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार

मी सर्वांचे आभार मानतो आणि राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वांचे सहकार्य मागतो. 18 जुलैपूर्वी मी सर्व मतदारांना (खासदारांना) भेटेन आणि त्यांचा पाठिंबा घेईन.

Droupadi Murmu : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू दिल्लीत, आज दुपारी 12 वाजेनंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार
द्रौपदी मुर्मूImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 24, 2022 | 9:41 AM
Share

नवी दिल्ली : एनडीए (NDA)च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) काल त्यांच्या मूळ राज्य ओडिसा भुवनेश्वरहून दिल्लीत आल्या. तसेच त्या आज आपला उमेदवारी दाखल करणार आहेत. पण यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. झारखंडच्या माजी राज्यपाल 64 वर्षीय मुर्मू शुक्रवारी पंतप्रधान मोदी, ज्येष्ठ मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा या नेत्यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजेनंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नामांकना दरम्यान, राज्य सरकारचे दोन ज्येष्ठ मंत्री ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) चे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

द्रौपदी मुर्मू आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या आणि पर्यायाने भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत.  त्यां कालच दिल्लीत दाखल झाल्या आहेत.  आज त्या आपला उमेदवारी दाखल करणार आहेत.  दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी 12 वाजेनंतर त्या आपला अर्ज दाख करतील. यावेळी ओडिसा सरकारचे दोन ज्येष्ठ मंत्री ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

बीजेडीने मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. तर मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी तयार करण्यात येत आहे. तर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रस्तावक आणि समर्थक म्हणून स्वाक्षऱ्या करत आहेत. बीजेडीचे सस्मित पात्रा, ज्यांच्या पक्षाने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे, त्यांनी जोशी यांच्या घरी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. तर मुर्मू या दिल्लीत आल्यावर, दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता, पक्षाचे खासदार मनोज तिवारी आणि दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश बिधुरी यांच्यासह अनेक नेत्यांनी मुर्मू यांचे विमानतळावर स्वागत केले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.