Netresh Sharma : करौली हिसांचारात आगीत अडकलेलं कुटुंब, तिघांचा जीव वाचवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलच्या धाडसाची देशभर चर्चा
राजस्थानच्या (Rajasthan) करौलीमध्ये (Karauli) नववर्ष स्वागताच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून हिंसाचार झालेला होता. जाळपोळ देखील झाली होती. या घटनेतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जयपूर : राजस्थानच्या (Rajasthan) करौलीमध्ये (Karauli) नववर्ष स्वागताच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून हिंसाचार झालेला होता. जाळपोळ देखील झाली होती. या घटनेतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो एका पोलीस काँन्स्टेबलचा आहे. पोलीस कॉन्स्टेबल आगीत अडकलेल्या एका लहान मुलाला कपड्यात लपेटून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत धावताना दिसतोय. या आगीतून या पोलिसानं तीन जणांचा जीव वाचवला. हा फोटो सगळीकडे आता व्हायरल होताना दिसत आहे. राजस्थानच्या करौलीमध्ये नववर्ष स्वागतासाठी रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत मारामारी आणि आग लावण्याच्या घटना घडल्या. या आगीतून पोलीस कॉन्स्टेबल नेत्रेश शर्मा (Netresh Sharma) यांनी एका लहान मुलासह दोन महिलांचा जीव वाचवला.नैत्रेश यांच्या धाडसाचं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कौतुक केलं आहे. नेत्रेश यांना पदोन्नती देखील देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
हंसराज मीना यांचं ट्विट
मेरे करौली जिले में फिलहाल सामान्य स्थिति है। पहली बार जिलें में इस प्रकार की घटना हुई है, जो कि दुर्भाग्यपूर्ण थी। यहां सभी जाति, धर्म के लोग भाईचारे से रहते है। कृपया गलत अफवाह फैलाकर मेरे जिलें के वातावरण में जहर ना घोलें। 4 लोगों की जान बचाने वाले कांस्टेबल नेत्रेश को सलाम। pic.twitter.com/E10Nnxenut
— Hansraj Meena (@HansrajMeena) April 4, 2022
राजस्थानात करोलीमध्ये हिसांचाराची घटना घडली होती. समाजकंटकांनी दुकानांना देखील आग लावली होती. हिंसा हो असलेल्या ठिकाणापासून आग लागलेल्या दुकानात एका लहान बाळा सह दोन महिला अडकल्या होत्या. त्या दोन्ही महिला आणि त्या बाळाला पाहून कॉन्स्टेबल नेत्रेश यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. आपल्या जीवाचा विचार न करता नेत्रेश यांनी तिघांना वाचवण्याचा निर्णय घेतला. नेत्रेश यांनी महिलांच्या जवळील दुपट्ट्यानं त्या बाळाला झाकलं आणि खांद्यावर घेत आगीतून धावत बाहेर पडले. यानंतर त्या महिलांचा देखील त्यांनी जीव वाचवला.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
नेत्रेश यांनी दाखवलेल्या धाडसाचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. एखाद्या चित्रपटातील घटनेसारखी घटना प्रत्यक्षात घडल्याचं हा फोटो पाहून वाटतं. सोशल मीडियावर हा फोटो पाहून अनेक जण नेत्रेश यांचं कौतुक करत आहेत.
मुख्यमंत्र्यांचा फोन आणि कौतुक
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नेत्रेश यांना फोन करुन त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल कौतुक केलं आहे. नेत्रेश यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देखील अशोक गेहलोत यांनी दिल्या आहेत. नैत्रेश 2013 मध्ये राजस्थान पोलिसांच्या सेवेत रुजू झाले होते. त्यांचं प्रमोशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते करौली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.