ट्रेनमध्ये या वस्तू नेण्यास आहे सक्त मनाई, पकडल्यास होऊ शकतो मोठा दंड

भारतीय रेल्वेने ट्रेन आणि प्रवाशांची सुरक्षा पाहून अनेक वस्तूंसह प्रवास करण्यावर निर्बंध आणले आहेत. ट्रेनचा प्रवास करताना सोबत कोणत्या वस्तूंना टाळावेत ते पाहा...

ट्रेनमध्ये या वस्तू नेण्यास आहे सक्त मनाई, पकडल्यास होऊ शकतो मोठा दंड
Indian RailwayImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 3:07 PM

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : भारतात रेल्वे हा प्रवासाचा सर्वात जलद आणि स्वस्त पर्याय असल्याने प्रवाशांची संख्या अधिक आहे. भारतीय रेल्वे ( Indian Railway ) दररोज 13,000 ट्रेन चालविते. रेल्वेने दररोज दोन कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करीत असतात. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एवढी आहे. रेल्वेतून प्रवासी अनेक वस्तूंसह प्रवास करीत असतात. तुम्ही जर ट्रेनने प्रवास करणार असाल तर मनाला वाटेल तशा वस्तू घेऊन गेल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. ज्या वस्तूंमुळे प्रवाशांच्या जिवीताला धोका निर्माण होईल अशा वस्तूंसह प्रवास करण्यास मनाई आहे. प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास केल्यास तुम्हाला केवळ दंडच नाही तर तुरुंगवास देखील होऊ शकतो.

भारतीय रेल्वेने ट्रेन आणि प्रवाशांची सुरक्षा पाहून अनेक वस्तूंसह प्रवास करण्यावर निर्बंध आणले आहेत. ट्रेनचा प्रवास करताना अनेक वस्तूंना प्रतिबंधित केले आहे. यात अशा वस्तू आहेत की ज्याच्यामुळे ट्रेनला आग लागु शकते, ट्रेन अस्वच्छ होऊ शकते, अन्य प्रवासांना असुविधा आणि ट्रेनचा अपघात होऊ शकतो अशा वस्तूंवर बंदी आहे. या वस्तूंसोबत कोचमधून प्रवास करण्यावरच नव्हे तर लगेजच्या डब्यातूनही नेण्यास बंदी आहे.

या वस्तूंसह प्रवासाला मनाई

रेल्वे प्रवासादरम्यान स्टोव्ह, गॅस सिलिंडर, कोणत्याही स्वरुपातील ज्वलनशील केमिकल, फटाके, एसिड, दुर्गंधीयुक्त पदार्थ, चमडे किंवा ओले चामडे, पाकिटातून नेता येणारे तेल, ग्रीस ज्याच्या गळतीने अन्य प्रवासी आणि त्यांच्या सामानला नुकसान होईल, रेल्वेच्या नियमानूसार किमान 20 किलोग्रॅमपर्यंत तूप तुम्ही घेऊन जाऊ शकता.परंतू तूपाच्या डब्यांना नीट पॅक करायला हवे.

तीन वर्षांचा कारावास 

रेल्वे प्रवासात प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करण्यास मनाई आहे. जर कोणी प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करताना सापडला तर त्याला रेल्वे कायदा कलम 164 अनूसार कारवाई होऊ शकते. या कलमांतर्गत प्रवाशावर 1000 रुपयांपर्यंत दंड किंवा तीन वर्षांचा कारावास वा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.