AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्जाधिशांची यादी आली, गौतम अदानी कुठे पोहचले अन् अंबानी कोणत्या क्रमांकावर

गौतम अदानी यांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून सुमारे $81 अब्ज संपत्ती गमावली आहे. आता ते जगातील 33 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

अब्जाधिशांची यादी आली, गौतम अदानी कुठे पोहचले अन् अंबानी कोणत्या क्रमांकावर
घसरणीला ब्रेक लागेना
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 3:59 PM

नवी दिल्ली : महिन्याभरापूर्वी म्हणजेच 24 जानेवारी रोजी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या आयुष्यात वादळ आले. हे वादळ अजून ही शमले नाही. केवळ एका अहवालाने अदानी यांचे साम्राज्य हादरले आहे. अमेरिकन संशोधन फर्म हिंडनबर्गच्या अहवालाने (Hindenburg Report) अदानी समूहाची मोठी पडझड केली आहे. एका महिन्यात 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. अदानी समूहाच्या (Adani Group)शेअर्सचे एकूण मार्केट कॅप एका महिन्यात 62 टक्क्यांनी खाली येऊन 7.32 लाख कोटी रुपयांवर आले आहे. हिंडनबर्गच्या अहवालात अदानी समुहाचे शेअर ओव्हरड्यू असल्याचे म्हटले होते.

आता गेले 33 व्या क्रमांकावर

गौतम अदानी यांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून सुमारे $81 अब्ज संपत्ती गमावली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानीची एकूण संपत्ती आता $35.3 बिलियनवर आली आहे. आता ते जगातील 33 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एका महिन्यातच अदानीचे शेअर्स 85 टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये, गौतम अदानी $ 150 अब्ज संपत्तीसह पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीकडे वाटचाल करत होते. यादीत मुकेश अंबानी आठव्या क्रमांकावर आले आहे.

हे सुद्धा वाचा

अंबानी आशियात सर्वात श्रीमंत

गौतम अदानी यांची संपत्ती कमी झाल्यामुळे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ठरले आहे. आता मुकेश अंबानी $ 84.1 अब्ज संपत्तीसह टॉप-10 श्रीमंतांमध्ये आठव्या क्रमांकावर आहेत. जर आपण संपत्तीमधील फरक पाहिला तर अंबानींची संपत्ती अदानीपेक्षा 48.8 अब्ज डॉलर जास्त आहे आणि ती वाढत आहे.

का घसरली संपत्ती

24 जानेवारी 2023 रोजी, अमेरिकेच्या शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने गौतम अदानीबद्दल 106 पानांचा अहवाल जारी केला. यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत जगाचा दृष्टिकोनच बदलला. समूहाच्या शेअर्समध्येही वादळ आले. या अहवालामुळेच गौतम अदानी यांची वैयक्तिक संपत्तीही बुडाली. महिन्याभरापूर्वी जगातील टॉप 3 श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत असलेले गौतम अदानी आता जगातील टॉप 30 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

जानेवारी आणि फेब्रुवारीत गौतम अदानी यांनी सर्वाधिक संपत्ती गमावली आहे. या काळात अदानी यांचे 77 अब्ज डॉलर स्वाहा झाले आहेत.  24 जानेवारीपासून अदानी समूहासाठी एकच बाब दिलासादायक ठरली आहे, ती म्हणजे भारतीय रेटिंग एजन्सीजीने अद्याप या कंपन्यांचे मानांकन कमी केलेल नाही. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.