Goa : बीचवर झिंग झिंग करणे पडेल महागात.. तर बसेल 50,000 हजारांपर्यंत दंड.. गोवा सरकारचा हा नवीन निर्णय माहिती आहे का?

Goa : गोव्यात मित्रांसोबत पार्टी करणे तुम्हाला आता महागात पडू शकतं..

Goa : बीचवर झिंग झिंग करणे पडेल महागात.. तर बसेल 50,000 हजारांपर्यंत दंड.. गोवा सरकारचा हा नवीन निर्णय माहिती आहे का?
पार्टी पडेल महागातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 9:04 PM

पणजी : जर तुम्हीही मित्रांसोबत गोव्यात (Goa) एन्जॉय करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. आता गोव्यात समुद्र किनारी (Seaside)या गोष्टी करणे तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला 50,000 हजार रुपयांपर्यंतचा भूर्दंडही (Heavy Penalty) बसू शकतो. गोवा सरकारने नियमात बदल केल्याने अशा वर्तवणुकीचा तुमच्यासह मित्रांनाही मनस्ताप होऊ शकतो.

गोवा सरकारने समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छतेसाठी कठोर नियमांची घोषणा केली आहे. त्यानुसार, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याा पर्यटकांना आर्थिक दंड ठोठावला जाईल. गोवा पोलिसांची समुद्र किनाऱ्यावर गस्त आणखी कडक करण्यात येणार आहे.

31 ऑक्टोबरपासून गोव्याचा समुद्र किनाऱ्यावर वाहन चालविणे आणि स्वयंपाक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यासाठी दोषी व्यक्तींवर कडक कारवाई गोवा पोलिस करणार आहे. त्यासाठी दक्षता पथकही असतील.

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर एखादी व्यक्ती किनाऱ्यावर दारु पिताना आणि बाटल्या फोडताना आढळली, कचरा करताना सापडली. तर अशा व्यक्ती, ग्रुपवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर जबर दंड ठोठावण्यात येणार आहे.

अर्थात हा नियम काही फक्त पर्यटकांना लागू असेल असे नाही . तर समुद्र किनाऱ्यावर जेवण, दारुचा पुरवठा करणारे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर सेवा पुरवठादारांवर ही लागू असतील. वॉटर स्पोर्टस हा ठराविक ठिकाणी सुरु असेल.

आता उघड्यावर तिकीट विक्री करता येणार नाही. त्यासाठी संबंधितांना तिकिट काऊंटर उघडावे लागतील. फेरीवाले, हातगाडीवाले यांनी पर्यटकांना अडथळा ठरेल अशी वर्तुणूक केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांना आर्थिक दंड लावण्यात येईल. अशा व्यक्तींना, ग्रुपला, आयोजकांना 5,000 ते 50,000 अथवा नियमानुसार जे योग्य असेल ती रक्कम दंड म्हणून जमा करावी लागेल.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.