इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार, 1000 रुग्ण आढळल्याने खळबळ
इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या विषाणूचे 1000 जणांना संक्रमण झाले आहे. (new variant coronavirus England)
लंडन : जगभरात कोरोनाला (Coronavirus) थोपवण्याठी कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी संशोधक दिवसरात्र एक करत आहे. अमेरिकेसारख्या देशात तर लसीकरणास सुरुवातही झाली आहे. मात्र, इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे. (new variant of coronavirus found in England)
विषाणूवर अभ्यास करणे सुरु
ब्रिटिश वैज्ञानिकांनी या नव्या कोरोना विषाणूबद्दल यापूर्वीच माहिती दिली होती. इंग्लंडचे आरोग्यमंत्री मॅट हॅटकॉक यांनी नव्या विषाणूबद्दल अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या देशात 60 वेगवेगळ्या ठिकाणी नव्या कोरोना विषाणूचे संक्रमण झालेले रुग्ण आढळले आहेत. ब्रिटिश सरकारने या नव्या कोरोना विषाणूबद्दल जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) कळवलं आहे. तसेच, ब्रिटिश वैज्ञानिकही या विषाणूवर अभ्यास करत असल्याचे हॅटकॉक यांनी सांगितलं.
वैज्ञानिकांनी सांगितलं घाबरू नका
यावेळी हॅटकॉक यांनी या विषाणूबद्दल अधिकची माहिती देताना नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हा विषाणू पहिल्या विषाणूच्या तुलनेक कमी धोकादायक असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरुन जाण्यापेक्षा योग्य खबरदारी घेण्याचंही त्यांनी सांगितलं. दक्षिण इंग्लंडमध्ये नव्या कोरोना विषाणूचा आतापर्यंत 1000 जणांना संसर्ग झाला आहे. या भागातील स्थानिक प्रशासनाने ही आकडेवारी दिली आहे.(new variant of coronavirus found in England)
नव्या कोरोना विषाणूच्या प्रोटीनमध्ये वाढ
इंग्लंडचे मुख्य आरोग्य अधिकारी प्रोफेसर क्रिस विटी यांनीदेखील या विषाणूबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या नव्या कोरोना विषाणूमध्ये प्रोटीनची वाढ झालेली आहे. विषाणूतील प्रोटीन वाढल्यामुळे हा विषाणू शरीरावर गंभीर परिणाम करु शकतो. सध्यातरी नव्या कोरोना विषाणूबद्दल जास्त काही सांगणे योग्य नाही, असेही प्रोफेसर विटी यांनी सांगितले.
पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 86 ठिकाणी 26 हजार स्ट्रॉबेरी झाडांची लागवडhttps://t.co/RMMzCuCQPf#Strawberry #Palghar #Farmer
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020
संबंधित बामत्या :
कोरोनातून बरे झाल्यानंतरही नव्याच आजाराचं संकट; जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार?
कोरोना लसनिर्मिती ते लसीकरण, जाणून घ्या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं
Reduce Corona Test Rate | कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात, पाहा नवीन चाचणीचे दर…
(new variant of coronavirus found in England)