एनआयए ॲक्शन मोडवर; गँगस्टर, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या कारवाईसाठी रणनिती आखली…
सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाल्यानंतर संशयित दहशतवादी टोळ्यांबाबत एनआयएकडून पंजाबसह दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर त्या छाप्यात पंजाबमधून खलिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळताच त्यांच्यावरही कठोर कारवाई केली गेली आहे.
नवी दिल्लीः भारतात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रमाण वाढल्याने कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या गुन्हेगारी कारवायांमध्ये अडकलेल्या अनेक गुंडांना आणि दहशतवाद्यांवर यापूर्वी वेगवेगळ्या राज्यांतून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. दहशतवाद्या कारवायामध्ये अडकलेल्यांचा पाकिस्तानातील गुप्तचर संस्था, आयएसआय (ISI) आणि खलिस्तानी दहशतवाद्यांशी (Khalistani terrorists) संबंध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतही यामधील काही जण सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मुसेवाला यांची हत्या करणाऱ्या गुंडांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचेही एनआयएच्या (NIA) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या कारवायांमध्ये अडकलेले आरोपी त्यांचा म्होरक्या सांगेल त्या पद्धतीने त्यांच्याकडून गुन्हे केल जात असल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे देशातील अशा गुंडांचे ‘दहशतवादी कनेक्शन’ शोधण्यासाठीच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाया सुरु झाल्या आहेत.
एनआयएकडून अनेक जणांवर कारवाया
वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेल्या दहशतवादी आणि इतर गुन्ह्यातील अनेक जणांवर कारवाया करत एनआयएकडून किमान 60 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या 60 ठिकाणांमध्ये दिल्ली, एनसीआर, पंजाब आणि हरियाणातील काही ठिकाणांचा समावेश आहे. तपास यंत्रणेकडून या गुंडांच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी छापे टाकले गेले आहेत.
दहशतवाद्यांबरोबर संबंध
गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांकडून तपास करण्यात आल्यानंतर आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवाद्यांबरोबर संबंध असल्याची अनेक प्रकरणं उघड झाली आहेत. विशेषत पंजाबमधील टोळ्यांवर एनआयएकडून थेट कारवाया केल्या जात असल्याने आता देशातील विविध भागात असलेल्या टोळ्याही तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत.
मोहाली रॉकेट लाँचर हल्ला आणि लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासातही आयएसआय-खलिस्तानी-गुंडांचा संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
पंजाब, दिल्ली, हरियाणात छापे
सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाल्यानंतर संशयित दहशतवादी टोळ्यांबाबत एनआयएकडून पंजाबसह दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर त्या छाप्यात पंजाबमधून खलिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळताच त्यांच्यावरही कठोर कारवाई केली गेली आहे.
तुरुंगात असूनही कारवायातून सहभाग
दिल्लीतील अलीपूर येथील गँगस्टर टिल्लू ताजपुरियाच्या घरावरही एनआयएकडून छापा टाकण्यात आला आहे. टिल्लू ताजपुरिया सध्या दिल्लीच्या तुरुंगात असून तरीही तो कारवायामध्ये सहभागी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तुरुंगात असतानाच त्याने जितेंद्र गोगीची हत्या केली होती, त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकरणातील अनेकांवर थेट कारवाई केली गेली आहे.