Toll Plaza : नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा, वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार!

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत (Lok Sabha) मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके (Toll plaza) हटवण्यात येतील.

Toll Plaza : नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा, वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार!
nitin gadkari, Toll plaza
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 12:39 PM

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत (Lok Sabha) मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके (Toll plaza) हटवण्यात येतील. टोलच्या जागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल, असं नितीन गडकरी म्हणाले. सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लोक रस्तेप्रवास जेव्हढा करतील, तेव्हढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं गडकरींनी नमूद केलं. (Nitin Gadkari Big Announcement In Lok Sabha, Says Government Working To Do Away With All Toll Plazas In The Country By next Year )

उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी उत्तर दिलं.

गडकरींनी मागील सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचं म्हटलं. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

जेव्हढा रस्ता वापराल, तेव्हढाच टोल

नितीन गडकरी म्हणाले, “जर आम्ही टोलनाके बंद केले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आमच्याकडे भरपाई मागतील. मात्र सरकारने पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्याची योजना केली आहे”

टोल हटवणे म्हणजे टोलनाके हटवणे असा अर्थ आहे. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हढा हायवेचा प्रवास केला किंवा जेव्हढा रस्ता वापरला तेव्हढाच टोल तुम्हाला द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले.

टोलनाकामुक्त देश… काय आहे GPS प्रणाली?

रशियन सरकारच्या मदतीने 2 वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएसला अंतिम स्वरूप जीपीएस प्रणालीतून टोल थेट बँक खात्यातून वजा होणार वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल होणार तंत्रज्ञानामुळे पारदर्शक व्यवहार, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य

कसं चालतं जीपीएस (GPS) सिस्टमचं काम?

ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम सुमारे 30 उपग्रहांचे नेटवर्क 20,000 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरते उपग्रह तुम्ही कुठे आणि कोणत्या वाहनासोबत आहात याची अचूक माहिती जीपीएस रिसीव्हरकडून सिग्नल रिसीव्ह करुन प्रक्रियेला सुरुवात ऑटोमॅटिक घड्याळ्यांच्या माध्यमातून सॅटेलाईटमार्फत माहिती जीपीएस प्रणालीच्या आधारे वाहनाच्या हलचालीवरून आकारणार टोल कार, नौका, विमान, सेल्युलर फोनमध्ये सिस्टम वापरण शक्य 1970 च्या दशकात अमेरिकेकडून जीपीएस प्रणालीचा विकास

यापूर्वी नितीन गडकरी काय म्हणाले होते?

ही जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर टोलचे पैसे थेट बँक खात्यातून वळते होणार. सरकार जुन्या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्याची योजना आखत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या टोल उत्पन्नात 5 वर्षात प्रचंड वाढ होईल.

संबंधित बातम्या 

Special Report : न्यायाधिशांकडून टोलमध्ये सूट मिळवण्याचा प्रयत्न, टोल मॅनेजरनेच शिकवला कायदा

टोलनाकामुक्त देश… तुमचा टोल कसा कटणार?

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.