खासदार आमदार टोल का देत नाहीत? नितीन गडकरी म्हणतात…
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी खासदार आणि आमदार का टोल देत नाहीत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
नवी दिल्ली: सामान्य जनता आणि वाहनधारकांच्या खिशाला वाढत्या टोलदरांमुळे (Toll Rate) कात्री बसत असते. वारंवार वाढणाऱ्या टोलच्या दरांमुळं सामान्य नागरिक त्रस्त असतात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी खासदार आणि आमदार का टोल देत नाहीत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. नितीन गडकरींनी सरकारनं टोलमधून कोणाकोणाला सूट दिलेली आहे याची यादीचं सांगितली आहे.
कुणा कुणाला टोलमधून सवलत
संरक्षण दलं, रुग्णवाहिका, ट्रॅक्टरमधून मालवाहूतक करणारे शेतकरी आणि खासदार आमदारांना टोलमधून सूट दिल्याची माहिती दिली. मात्र, सर्वांना सूट देता येणार नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं.जर आपल्याला चांगल्या रस्त्यावरुन जायचं असेल तर पैसे द्यावे लागतील, असं गडकरी म्हअणाले. पहिल्यांदा लोक ट्राफिक जाममध्ये अडकायचे त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलवर पैसे वाया जायचे. आता चांगल्या रस्त्यामुळं पैसे वाचत आहेत. त्याऐवजी टोल दिला तर काय अडचण आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
रस्ते बांधण्यासाठी घेतलेल्या पैशाचं व्याज द्यावं लागतं
सरकारनं रस्ते बनवण्यासाठी कर्जावर पैसे घेतलेले आहेत. ते परत द्यावे लागतात त्यावरील व्याज द्यावं लागतं. या कारणामुळे टोल घ्यावा लागतो, असं नितीन गडकरी म्हणाले.इफ्रा बाँडविषयी चर्चा करताना गडकरींनी तुम्ही बँकेत पैसे ठेवता त्यावेळी किती व्याज मिळतं. त्याऐवजी सरकारला रस्ता बनवण्यासाठी तुम्ही पैसे द्या, आम्ही जादा व्याज देऊ, असं नितीन गडकरी म्हणाले.
दिल्ली मुंबई हायवे बांधण्यासाठी 1 लाख कोटींचा खर्च
दिल्ली मुंबई हायवे बांधण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी लोकांकडून इन्फ्रा बाँडच्या माध्यमातून पैसे उभारण्यात येतील, असंही ते म्हणाले. सरकार देशात 26 ग्रीन एक्स्प्रेस हायवे उभारत आहे. येत्या दोन वर्षात आपण रस्ते मार्गानं दिल्ली ते श्रीनगर असा प्रवास 8.5 तासांमध्ये पूर्ण करु असं नितीन गडकरींनी सांगितलं. रस्ते बांधण्यासाठी आपल्याला पारदर्शक, रिझल्ट ओरिएंडेड, टाईम बाऊंड आणि गुणवत्तेशी प्रामाणिक राहायला हवं असंही ते म्हणाले.
इतर बातम्या:
VIDEO: यूपीए कुठे आहे? ममता बॅनर्जींच्या प्रश्नात दम, पण…; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Nitin Gadkari gave answer of question why mp and mla did not pay toll