पंडीत नेहरु आणि अटलबिहारी वाजपेयी भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करावं : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते आहेत, असं मत व्यक्त केलंय. तसेच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं सर्वांनीच आत्मचिंतन करत जबाबदारीने वागलं पाहिजे असंही नमूद केलं.

पंडीत नेहरु आणि अटलबिहारी वाजपेयी भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करावं : नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 10:52 AM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते आहेत, असं मत व्यक्त केलंय. तसेच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं सर्वांनीच आत्मचिंतन करत जबाबदारीने वागलं पाहिजे असंही नमूद केलं. दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली ही मतं मांडली.

नितीन गडकरी म्हणाले, “पंडीत जवाहरलाल नेहरु आणि अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते होते. दोघेही आम्ही आमच्या लोकशाही मर्यादांचं पालन करु असे म्हणत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कामाचा वारसा आमच्यासाठी प्रोत्साहनचा स्त्रोत आहे. जवाहरलाल नेहरु यांचंही भारतीय लोकशाहीत मोठं योगदान आहे.”

संसदेच्या मान्सून अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी कृषी कायदे, इंधन दरवाढ आणि पेगसस मालवेअरचा उपयोग करुन पाळत ठेवल्याच्या आरोपावरुन जोरदार गोंधळ घातला. यावर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं.

लोकशाहीत वागण्याची ही पद्धत नाही, अटलजींनी गडकरींना सुनावलं

नितीन गडकरी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबत एक महत्त्वाची आठवण सांगितली. ते म्हणाले, “मी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता होतो. तेव्हा मी सभागृहातील गोंधळाचं नेतृत्व करत होतो. दरम्यान मी अटलबिहारी वाजपेयी यांना भेटलो. तेव्हा वाजपेयी यांनी ही लोकशाहीत वागण्याची पद्धत नाही. लोकांपर्यंत योग्य संदेश देणं महत्त्वाचं आहे.”

“आजचे सत्ताधारी विरोधी पक्ष होतील आणि विरोधी पक्ष सत्ताधारी होईल”

आज जे सत्तेत आहेत ते विरोधी पक्षात जातील आणि आज विरोधी पक्षात आहेत ते उद्या सत्तेत येतील. आपल्या भूमिका बदलत राहतात. मात्र, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करण्याती गरज आहे. प्रत्येकाने मर्यादेचं पालन केलं पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे लोकशाहीची दोन चाकं आहेत. त्यामुळे मजबूत विरोधी पक्ष लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून मजबूत बनावी, असंही गडकरींनी नमूद केलं.

हेही वाचा :

Vehicle Scrappage Policy : सामान्य माणसांसाठी उत्तम काम करणार स्क्रॅपेज धोरण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितले 2 मोठे फायदे

आता शिवसेनाही टाकणार लेटरबॉम्ब, गडकरींना करणार सवाल; उदय सामंतांची माहिती

‘बाकीचे भाषण करतात, गडकरी काम करतात’, बच्चू कडू यांच्याकडून कौतुक; गडकरींच्या पत्राबाबत कारवाईची मागणी

व्हिडीओ पाहा :

Nitin Gadkari say Pandit Nehru and Atalbihari Vajpayee are ideal leaders of Indian democracy

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.