Nitin Gadkari : आता स्पर्धा हवेशी, दिल्ली करा 12 तासात सर, काय आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅन..
Nitin Gadkari : 'दिल्ली अब दूर नही', हे वाक्य लवकरच सत्यात येणार आहे.
नवी दिल्ली : दिल्ली (Delhi) आता नक्कीच दूर राहणार नाही. कारण वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत तुम्हाला दिल्ली गाठता येणार आहे. देशाची राजधानी मुंबईवरुन (Mumbai) अवघ्या 12 तासात सर करता येईल. यासाठी तुम्हाला पुढील 4-5 वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. दिल्ली से मुंबईपर्यंतच्या एक्सप्रेसवे (Express Way) बांधून तयार होत आहे. या डिसेंबर महिन्यातच हे काम पूर्ण होईल. त्यामुळे आर्थिक राजधानीतून दिल्लीत येण्यासाठी आता दोन दिवसांची वाट पाहण्याची गरज नाही.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी या व इतर प्रकल्पांची माहिती दिली. त्यानुसार, त्यांचे मंत्रालय येत्या काही दिवसात पाच ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे तयार करणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा मध्यप्रदेशला होणार आहे.
गडकरी यांनी रीवा जिल्ह्यात 2443.89 कोटी रुपये खर्च करुन एकूण 204.81 किलोमीटर लांबीच्या सात रस्त्याच्या योजनांचे उद्धघाटन केले. या राष्ट्रीय महामार्गातंर्गत मोहनिया डोंगररांगेत 1004 कोटी रुपये खर्च करुन 2.82 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे.
त्यांनी शेतीच्या विकासासोबत औद्योगिक विकासावर भर दिला. त्यासाठी पाणी, ऊर्जा, परिवहन योजनांवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठीच केंद्र सरकार पाच ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा फायदा मध्यप्रदेशला होणार आहे.
गडकरी यांनी सांगितले की, मुंबई आता केवळ 12 तासात गाठता येईल. हा हायवे या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या हायवेसाठी एक लाख कोटी रुपये खर्च आला आहे. हा हायवे 1,382 किलोमीटर लांबीचा असेल.
यासोबतच अटल प्रोगेस हायवेचे कामही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या हायवेला पूर्वी चंबल एक्सप्रेस हायवे नावाने ओळखल्या जात होते. या हायवेसाठी 15,000 कोटी रुपये लागणार आहे. अटल प्रोग्रेस-वे 415 किलोमीटर लांब असेल. हा हायवे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून जाईल.