No Confidence Motion | मोदी-शाहंनी INDIA ला आपल्या पीचवर आणून काँग्रेसचा गेम केला?
No Confidence Motion | गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली. स्ट्रॅटजीच्या दृष्टीने हे योग्य सुद्धा होतं. कारण ईशान्य भारतातील असल्याने त्यांना तिथल्या परिस्थितीची चांगली कल्पना आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत INDIA ने नरेंद्र मोदी सरकार विरोधात संसेदत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. मागच्या दोन दिवसांपासून अविश्वास प्रस्तावावर संसदेत जोरदार चर्चा आहे. आज चर्चेचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी संसेदत बोलणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार? याकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. मागच्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. मणिपूर जळत आहेत. दोन समुदायांमधील संघर्षात अनेक निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर बोलवं, अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजूनपर्यंत मणिपूरचा दौरा केलेला नाही, तसच ते या विषयावर बोलले सुद्धा नाहीयत.
….म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विषयावर बोलाव, यासाठी काँग्रेसप्रणीत INDIA ने संसदेत सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. मागच्या दोन दिवसांपासून संसेदतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये या मुद्यावरुन जोरदार डिबेट सुरु आहे. विरोधी पक्ष मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन सत्ताधारी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करतोय. त्याचवेळी भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.
ऐन मोक्याच्या क्षणी काँग्रेसने स्ट्रॅटजी बदलली
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या भाषणाने अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात झाली. खरंतर काँग्रेसच्या कुठल्या मोठ्या नेत्याने चर्चेला सुरुवात करण अपेक्षित होतं. पण काँग्रेसने ईशान्य भारतातून येणाऱ्या गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली. स्ट्रॅटजीच्या दृष्टीने हे योग्य सुद्धा होतं. कारण ईशान्य भारतातील असल्याने त्यांना तिथल्या परिस्थितीची चांगली कल्पना आहे. मणिपूर सुद्धा ईशान्य भारतामध्ये येतं.
‘यू आर नॉट इंडिया’
त्यानंतर भाजपाकडून निशिकांत दुबे यांनी उत्तर दिलं. निशिकांत दुबे यांनी जोरदार भाषण केलं. काँग्रेसवर पलटवार केला. काल लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी बोलले. मणिपूरच्या मुद्यावरुन त्यांनी आक्रमक भाषण केलं. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली, या त्यांच्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ झाला. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर लगेचच स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं. यू आर नॉट इंडिया असं त्या म्हणाल्या. त्यांनी काश्मिरी पंडितांचा मुद्दा उचलला.
भाजपाने अविश्वास प्रस्तावाचा कसा वापर केला?
संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरवरील चर्चेला उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला जिव्हारी लागणारे टोमणे मारले. संसदेत अविश्वास प्रस्तावावर सुरु असलेली सगळी चर्चा व्यवस्थित पाहिली, तर त्यातून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भाजपाकडून बोलणारे वक्त सभागृहात सरकारच्या कामांची यादी वाचून दाखवत आहेत.
….तर इतक्या ठळकपणे आपले मुद्दे मांडता आले नसते
अविश्वास प्रस्ताव काँग्रेसने मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी मांडला होता. विरोधक भाजपाला मणिपूरवरुन घेरण्याचा प्रयत्न करतायतय. त्याचवेळी मोदी सरकार राजस्थानमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, काश्मिरी पंडितांच्या विषयावरुन काँग्रेसवर पलटवार करतय. भाजपाचा प्रत्येक वक्ता आपल्या भाषणात मोदी सरकारच्या कार्याची जंत्री वाचून दाखवत आहे. अविश्वास प्रस्ताव नसता, तर मोदी सरकारला इतक्या ठळकपणे आपले मुद्दे मांडता आले नसते. पण अविश्वास प्रस्तावामुळे त्यांना ती संधी मिळालीय. म्हणूनच मोदी-शाहंनी INDIA ला आपल्या पीचवर आणून काँग्रेसचा गेम केला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.