Amartya Sen Death Rumors | नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा, मुलीचं ट्विट
Amartya Sen Death Fake News | अमर्त्य सेन यांच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं, मात्र अमर्त्य सेन हे ठणठणीत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Amartya Sen Death Rumors | प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ आणि नोबेल विजेत अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याचं वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट झालं आहे. अर्मत्य सेन यांची मुलगी नंदना देव सेन यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलंय. माझे बाबा अर्मत्य सेन हे ठणठणीत असल्याचं नंदना देव सेन यांनी ट्विट करत म्हटलंय. काही मिनिटांपूर्वी क्लाउडिया गोल्डिन या ट्विटर हँडलवरुन अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याचं ट्विट करण्यात आलं होतं. “एक वाईट बातमी, माझे प्राध्यापक अमर्त्य सेन यांचं निधन झालंय”, असं ट्विट करण्यात आलं होतं. मात्र या ट्विटनंतर लगेचच अमर्त्य सेन यांची कन्या नंदना देव सेन यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं. अमर्त्य सेन यांना 1998 साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
नंदना सेन यांचं ट्विट
आपल्या वडिलांच्या निधनाची अफवा पसरल्याचं कळताच नंदना सेन यांनी तातडीने ट्विट करत या संपूर्ण विषयाला पूर्णविराम लावला. नंदना सेन यांनी एक फोटो ट्विट केलाय. या फोटोत नंदना सेन आणि अमर्त्य सेन आणि एक लहान मुलगी दिसत आहे. नंदना यांनी अर्मत्य सेन यांची आस्थेने चौकशी करणाऱ्यांचे आभार मानले. “तुम्ही विचारपूस केली याबाबत मी तुमची आभारी आहे. मात्र बाबा पूर्णपणे बरे आहेत. आम्ही केम्ब्रिजमध्ये एकत्र आठवडा घालवला. आम्ही त्यांना कालच भेटलो”, असं नंदना सेन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
नंदना सेन यांचं ट्विट
Friends, thanks for your concern but it’s fake news: Baba is totally fine. We just spent a wonderful week together w/ family in Cambridge—his hug as strong as always last night when we said bye! He is teaching 2 courses a week at Harvard, working on his gender book—busy as ever! pic.twitter.com/Fd84KVj1AT
— Nandana Sen (@nandanadevsen) October 10, 2023
दरम्यान अर्मत्य सेन यांच्याच निधनाच्या खोट्या वृत्तामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. नेटकऱ्यांनी अर्मत्य सेन यांना श्रद्धांजलीही वाहिली. मात्र वृत्त खोट असल्याचं समजताच नेटकऱ्यांनी अर्मत्य सेन यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच त्यांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी प्रार्थना केली.