Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : माणुसकी संपली! रेमडेसिव्हीरसाठी आईने अधिकाऱ्याचे पाय पकडले, वैद्यकीय अधिकारी मात्र ढिम्म, अखेर मुलाचा दुर्देवी मृत्यू

जर तुम्ही वारंवार ऑफिसमध्ये आला तर मी तुम्हाला जेलमध्ये पाठवेन, अशी धमकी दिली. (Noida Covid Patients Crying for Remdesivir injection)

VIDEO : माणुसकी संपली! रेमडेसिव्हीरसाठी आईने अधिकाऱ्याचे पाय पकडले, वैद्यकीय अधिकारी मात्र ढिम्म, अखेर मुलाचा दुर्देवी मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 5:17 PM

नोएडा : देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे सर्वत्र कोरोनावर प्रभावी असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. नुकतंच उत्तरप्रदेशातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक कोरोनाबाधित कुटुंब नोएडाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी-सीएमओ (CMO) च्या रेमडेसिव्हीरसाठी हाता-पाया पडत आहे. तरी तो वैद्यकीय अधिकारी मात्र त्या महिलांना जेलमध्ये पाठवेन अशी धमकी देत आहे.(Covid Patients Cry and Touch Noida CMO feet for Remdesivir injection)

नेमकं प्रकरण काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या खोडा कॉलनीमध्ये रिंकी देवी यांच्या एकुलता एक मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या मुलावर सेक्टर 51 मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी रिंकी देवी यांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणा, असे सांगितले. मात्र त्यांना ते इंजेक्शन कुठेही मिळाले नाही. यानंतर रिंकी देवी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

यानंतर त्यांनी थेट सीएमओची गाठभेट घेऊन त्यांच्या हातापाया पडून इंजेक्शन देण्यासाठी विनंती केली. माझ्या मुलाचा जीव वाचवा यासाठी ती अक्षरश: गयावया करत होती. त्यांच्यासोबत इतर काही जणही त्या ठिकाणी इंजेक्शन देण्याची विनंती करत होती. त्यानंतर सीएमओ दीपक ओहरी यांनी त्याचे रुग्णालयासंबंधिचे पेपर घेतले. तर जर तुम्ही वारंवार ऑफिसमध्ये आला तर मी तुम्हाला जेलमध्ये पाठवेन, अशी धमकी दिली. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंजेक्शन न मिळाल्याने मुलाचा मृत्यू 

मात्र इतका संघर्ष केल्यानंतरही रिंकी देवींच्या मुलाला रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळाले नाही. त्यानंतर बुधवारी 4.30 वाजता त्या रिकाम्या हाताने रुग्णालयात पोहोचल्या. त्यावेळी त्यांच्या मुलाच्या निधनाची बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर रिंकी देवी धायमोकलून रडू लागल्या.

रिंकी देवी गेल्या तीन दिवसांपासून एका रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी वणवण फिरत होत्या. मात्र सीएमकडून धमकी आणि गैरवर्तनाशिवाय तिच्या पदरात दुसरं काहीही पडले नाही. दरम्यान सेक्टर 39 सीएमओ कार्यालयाबाहेर आजही औषधं, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसाठी प्रचंड गर्दी असते. पण सीएमओ अधिकाऱ्याला याच्याशी काहीही घेणंदेणं नसतं.

व्हिडीओ व्हायरल

विशेष म्हणजे यापूर्वीही रिंकी देवी या रेमडेसिव्हीरसाठी सीएमओच्या कार्यालयात जात होत्या. त्यांच्यासोबत इतर सात-आठजणही होते. त्यांनाही रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज होती. त्यांच्यासोबतही हीच घटना घडली असल्याचा दावा केला जात आहे. तसेच एखादी महिला सीएमओकडे इंजेक्शनसाठी वारंवार विनंती करत होती. त्यावेळी तुम्हाला रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळेल. जेव्हा ते उपलब्ध होईल, तेव्हा ते दिले जाईल. जर तुम्ही इथे परत आलात तर तुम्हाला जेलमध्ये पाठवले जाईल, अशी धमकीही देण्यात आली. (Covid Patients Cry and Touch Noida CMO feet for Remdesivir injection)

संबंधित बातम्या : 

भल्याभल्यांना जे जमत नाही ते पठ्ठ्यानं केलं, दुसऱ्याच्या प्रेमात पडलेल्या बायकोचं थेट लगीन लावून दिलं!

कोरोना संकटात आम्ही मूकदर्शक बनू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला 7 सवाल

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.