Noida Murder CCTV : तो फोटो काढायला गेला अन् बाऊन्सर्सनी जीवानिशी संपवला, सीसीटीव्हीत हत्या कैद
25 एप्रिल रोजी ब्रिजेश ची हत्या करण्यात आली. गार्डन गॅलेरिया मॉलमध्ये पार्टीदरम्यान गोंधळ झाला होता. त्याचे रूपांतरण 35 वर्षीय ब्रिजेशच्या मारहाणीत झालं. ज्यात ब्रिजेश मृत्यू झाला. ब्रिजेश राय बिहारमधील (Bihar) छपरा येथील रहिवासी होता.
नोयडाच्या (Noida) गार्डन गलेरिया मॉलच्या लॉस्ट लेमन बारमध्ये नुकत्याच एका तरुणाच्या हत्येची घटना घडली होती. या खळबळजनक हत्येप्रकरणी आता महत्त्वपूर्ण खुलासा करणारं एक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाऊन्सर (Bouncer) आणि स्टाफ यांची ब्रिजेश रायसोबत जोरदार बाचाबाची आणि मारमारी होत असल्याचं दिसून आलं आहे. जेव्हा ब्रिजेश फोटो काढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा बाऊन्सर आणि स्टार बृजेशवर तुटून पडल्याचं दिसून आलंय. यानंतर ब्रिजेश ला जमिनीवर पाडून त्याला मारहाण करण्यात आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. या संपूर्ण हत्याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल गेलाय. संपूर्ण नोयडामध्ये खळबळ उडवून देणारं हे हत्याकांड असून या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटकही केली आहे. दरम्यान, आता समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांकडून तपासाला अधिक वेग आलाय.
नेमकं काय झालेलं?
25 एप्रिल रोजी ब्रिजेश ची हत्या करण्यात आली. गार्डन गॅलेरिया मॉलमध्ये पार्टीदरम्यान गोंधळ झाला होता. त्याचे रूपांतरण 35 वर्षीय ब्रिजेशच्या मारहाणीत झालं. ज्यात ब्रिजेश मृत्यू झाला. ब्रिजेश राय बिहारमधील (Bihar) छपरा येथील रहिवासी होता. आता या प्रकरणी पोलिसांनी गार्डन गॅलेरियाच्या लॉस्ट लेमन बारच्या 8 कर्मचाऱ्यांना ब्रिजेशला मारहाण करणे आणि त्यात त्याच्या मृत्यस कारणीभूत ठरणं असे आरोप ठेवण्यात आले आहेत.
मृत ब्रिजेश राय त्याच्या कंपनीने आयोजित केलेल्या पार्टीत गार्डन गॅलेरियाच्या लॉस्ट लेमन बारमध्ये सोमवारी पोहोचला होता. तिथे त्याचा बारच्या कर्मचाऱ्यांशी काही गोष्टीवरून वाद झाला. हा वाद पैशावरून झाल्याचा दावा सुरुवातीला केला जात होता. आता याप्रकरणातलं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्या जोरदरा राडा झाल्याचं भगायला मिळतंय. या वादानंतर बार स्टाफ आणि बाऊन्सरने त्याला बेदम मारहाण केली, त्यानंतर तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ब्रिजेश राय हा नोएडा येथील जेएलएन नावाच्या कंपनीत काम करत होता, जी ई-रिक्षाची बॅटरी बनवते. कंपनीने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी होण्यासाठीच तो तेथे पोहोचला होता. तो छपराच्या हसनपुरा येथील रहिवासी होता. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
In the last few seconds of the footage of Garden Galleria mall in #Noida, Brijesh is seen trying to click a photo from his mobile, during which the bouncer and the staff start beating him up. Later, he was killed. #CCTV pic.twitter.com/3Lmq3MO877
— Saurabh Trivedi (@saurabh3vedi) May 1, 2022