North Eastern Assembly Election 2023 Results LIVE : नागालँड-त्रिपुरामध्ये भाजपाचा विजय पक्का, मेघालयमध्ये कोणाला बहुमत नाही
North Eastern Assembly Election 2023 Result LIVE Updates : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये आज मतमोजणी होणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार असून हे तीन राज्य कुणाच्या ताब्यात जाणार कळणार आहे. या तिन्ही राज्यात विधानसभेच्या प्रत्येकी 60-60 जागा आहेत.
आगरतळा : पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये आज निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी 8 वाजता या तिन्ही राज्यात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. काही तासातच या तिन्ही राज्यातील परिस्थिती स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलनुसार त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपची सत्ता येणार आहे. तर मेघालयमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात की जनतेचा कौल काही और असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात पोहोचणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ७ वाजता भाजप मुख्यकार्यालयात पोहोचणार आहे.
त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार आहे.
पंतप्रधान मोदी यावेळी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतील.
-
Nagaland Elections 2023 Result Live | नागालँडमध्ये भाजपने 2 जागा जिंकल्या असून 11 जागांवर आघाडीवर
राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी 23 जागांवर आघाडीवर, 3 जागा जिंकत आहेत
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) 2 जागा जिंकल्या आहेत
अजूनही मतमोजणी सुरू
-
-
Nagaland Elections 2023 Result Live : आठवले गटाने जिंकल्या 2 जागा
निवडणूक आयोगाच्या आकड्यांनुसार नागालँडमध्ये भाजपा 2 जागा जिंकून 11 जागांवर आघाडीवर आहे. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी 3 जागांवर जिंकून 23 जागांवर आघाडीवर आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) 2 जागा जिंकल्या आहेत.
-
Nagaland Elections 2023 Result Live : इतिहासात पहिल्यांदा असं घडलं
नागालँडमध्ये आठवले गटाचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. इतिहासात पहिल्यांदा असं घडलय.
-
Tripura Election 2023 Result LIVE | त्रिपुरामध्ये भाजप 32 जागांवर आघाडीवर असून 1 जागा जिंकतेय
टिपरा मोथा पार्टी 11 जागांवर आघाडीवर
काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) 11 जागांवर आघाडीवर
अजूनही मतमोजणी सुरू
-
-
Meghalaya Election 2023 Result LIVE | मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टी 23 जागांवर आघाडीवर
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 1 जागा जिंकत आहे
युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी 7 जागांवर आघाडीवर
भाजप, काँग्रेस, टीएमसी 5-5 जागांवर आघाडीवर
-
Tripura Election 2023 Result LIVE त्रिपुरामध्ये भाजप 60 पैकी 33 जागांवर आघाडीवर
आगरतळा इथल्या मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या निवासस्थानी मिठाईचं वाटप
त्रिपुरा: अगरतला में मुख्यमंत्री माणिक साहा के आवास पर मिठाइयां बांटी जा रही हैं क्योंकि भाजपा 60 में से 33 सीटों पर आगे चल रही है। pic.twitter.com/7WFu29a7US
— ANI_HindiNews (@AHindinews) March 2, 2023
-
North eastern Election 2023 Result LIVE : नॉर्थ-ईस्टचा पहिला निकाल
मेघालयमध्ये एनपीपीचे स्निआवभालंग धर यांनी काँग्रेस उमेदवार एमलांग लालू यांना 2,123 मतांनी हरवलं. त्यांनी नर्तियांग विधानसभेची निवडणूक जिंकली. नागालँडमध्ये तुएनसांग सदर जागेवर भाजपा उमेदवार पी. बशांगमोंगबा चांग यांनी राकांपाच्या तोयांग चांग यांना 5,644 मतांनी हरवलं.
-
North eastern Election 2023 : त्रिपुरामध्ये भाजपची जोरदार आघाडी
नागालँडमध्ये भाजप आणि नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव पार्टीचे उमेदवार आघाडीवर
मेघालय मध्ये नॅशनल पीपल्स पार्टी म्हणजेच एनपीपीची जोरदार आघाडी
-
Tripura Election 2023 Result LIVE : त्रिपुरा-मेघालयमध्ये आमच्यासाठी उत्सव – भाजपा नेता
“संपूर्ण देशात जे सुरु आहे, तेच त्रिपुरात सुरु आहे. भाजपा इथे आघाडीवर आहे. आमच्यासाठी ही उत्सवाची वेळ आहे. काही पक्ष खातं उघडण्याचा प्रयत्न करतायत. सध्याच्या परिस्थितीत त्यांचं खातं उघडलं जाण कठीण आहे” असं भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले.
-
Nagaland Assembly Election 2023 Result Live : उपमुख्यमंत्री आघाडीवर
वोखा येथील तुई जागेवर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार वाय पॅटन 110 मतांनी आघाडीवर आहेत.
एनडीपीपीचे सुप्रीमो आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ हे त्यांचे जवळचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिस्पर्धी सेयेव्हिली सचू यांच्या विरुद्ध 6,394 मतांनी आघाडीवर होते.
-
Tripura Election 2023 Result LIVE : संबित पात्रा, महेश शर्मा इलेक्शन वॉर रुममध्ये
त्रिपुरामध्ये सतत ट्रेंडस बदलतायत. भाजपा हायकमांडने तात्काळ पावल उचालयाला सुरुवात केलीत. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि महेश शर्मा त्रिपुरा भाजपा इलेक्शनच्या वॉर रुममध्ये पोहोचले आहेत.
-
Tripura Election 2023 Result LIVE : त्रिपुरात पारडे फिरले
त्रिपुरात भाजपचा खेळ बिघडणार?
डाव्यांनी दिली कडवी झुंज
भारतीय जनता पार्टी 26 जागांवर पुढे
डाव्यांनी 20 जागांवर घेतली आघाडी
तर त्रिपुरा राजघराण्याचे प्रद्योत माणिक्य देबवर्मा यांच्या पक्षाचीही मुसंडी
टिपरा मोथा पार्टीची 13 जागांवर घौडदौड
-
TripuraElection2023Result LIVE : त्रिपुराचे उपमुख्यमंत्री पिछाडीवर
चारीलम एसटी जागेवरुन त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिश्नू देव वर्मा हे 1000 मतांनी पिछाडीवर आहेत. टिपराचे उमदेवार सुबोध देब बर्मा आघाडीवर आहेत.
-
Nagaland : NDPP 27 जागांवर आघाडीवर आहे
युतीचा भागीदार भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे
NPF – 3
काँग्रेस – 0
इतर – 9
-
Nagaland Elections 2023 Result Live : NDPP 11 जागांवर आघाडीवर
नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव पार्टी 11 जागांवर आघाडीवर आहे. भाजपाने 1 जागा जिंकली असून 3 जागांवर आघाडीवर आहे. जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांचे उमेदवार एक-एक जागांवर आघाडीवर आहेत.
-
North eastern Election 2023 : महिला मतदार जास्त पण आमदारकीपर्यंत कुणीच पोहोचलं नाही
६० वर्षानंतर पहिल्याच महिला आमदार निवडून येण्याची दाट शक्यता आहे.
चार मतदारसंघातून चार महिलांना उमेदवारी
नागालँडमध्ये आतापर्यंत २ महिला खासदार
-
TripuraElection2023ResultLIVE : काँग्रेस-डाव्यांच कमबॅक
त्रिपुरात सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपा आघाडीवर होती. भाजपाच्या आघाडीने बहुमताचा आकडा गाठला होता. पण आता ही आघाडी कमी झालीय. डावे आणि काँग्रेसच्या आघाडीने पिछाडीवरुन कमबॅक केलय. भाजपाकडे 29, डावे-काँग्रेस 19 आणि टीएमपी 12 जागांवर आघाडीवर आहे..
-
North eastern Assembly Election Result LIVE : TMC चा करिष्मा, एक मुख्यमंत्री आघाडीवर, एक पिछाडीवर
त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार माणिक साहा बोरदोवली मतदारसंघात आघाडीवर
मेघालयात एनपीपी सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर
परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि एनपीपीचे उमेदवार कोनराड संगमा पिछाडीवर
मेघालयात टीएमसीने करिष्मा दाखवला आहे. ममता बॅनर्जी यांचे पक्षाचे उमेदवारांची कडवी झुंज
-
North eastern Election 2023 : त्रिपुरा भगवे, नागालँडनेही दिला कौल, मेघालयात त्रांगडे
निवडणूक कलामध्ये त्रिपुरात भाजप 35 जागांवर पुढे
काँग्रेस, डावे मिळून 18 जागांवर आघाडीवर
नागालँडमध्ये भाजप, एनडीपीपी युती बहुमताकडे
भाजप, एनडीपीपी युतीची 45 जागांवर आगेकूच
एनपीएफ 5, काँग्रेस 1 जागेवर पुढे
मेघालयात भाजपचा 10 जागांवर घौडदौड
एनपीपी 23 जागांसह आघाडीवर
तृणमूलचीही काँटे की टक्कर, 11 जागांवर घेतली आघाडी
-
Tripura Election 2023 Result LIVE : भाजपाकडे 39 जागांची आघाडी
सुरुवातीचे जे कल हाती आलेत त्यानुसार, भाजपा 39 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डाव्यांची आघाडी 12 आणि टिपरा 9 जागांवर आघाडीवर आहे. राज्यात 16 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. 28.12 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 89.98 टक्के मतदान झालं होतं.
-
Tripura Election 2023 Result LIVE : त्रिपुरा मुख्यमंत्री देवाच्या चरणी
त्रिपुराचा कल अपेक्षेप्रमाणे येत असल्याने मुख्यमंत्री देवदर्शनाला
मुख्यमंत्री माणिक साहा देवाच्या दर्शनासाठी मंदिरात
त्रिपुरात भाजपची सध्या जोरदार मुसंडी, एक तासाचे कल, भाजपच्या बाजूने
-
Nagaland Elections 2023 Result Live : नागालँडमध्ये 183 उमेदवार निवडणूक रिंगणात
नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. राज्यात विधानसभेच्या 60 जागा आहेत. 59 सीटसाठी चार महिला, 19 अपक्षांसह 183 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाचे काजहेटो किन्मी यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं.
-
Meghalaya Election 2023 Result LIVE : मेघालयमधून एनपीपी आघाडीवर
मेघालयमध्ये एनपीपी 22 जागांवर आघाडीवर आहे. टीएमसी आणि भाजपामध्ये टफ फाइट सुरु आहे. दोन्ही पक्ष 10 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस 7 जागांसह पिछाडीवर आहे..
-
North eastern Election 2023 Result LIVE : सेव्हन सिस्टरमधील सत्तेचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार?
तीन राज्यांच्या मतमोजणीचा एक तास पूर्ण
मेघालयातील कल कोणा एकाच्या बाजूने नाही, कल काय म्हणतात
त्रिपुरात भाजपने मारली मुसंडी, कलामध्ये 32 जागांवर भाजप युतीची आघाडीवर
नागालँडमध्ये NDPP ने मारली बाजी, भाजपचाही युतीत समावेश
-
Chinchwad Assembly Election Live : अभिवादन करण्याताना भावूक झाल्या
अश्विनी जगताप या लक्षण जगताप यांच्या स्मृती स्थळ येथे अभिवादन करण्याताना भावूक झाल्या
-
Tripura Election 2023 Result LIVE : त्रिपुरात भाजपाचा दबदबा
त्रिपुरामध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे.. भाजपा सध्या 36 जागांवर आघाडीवर आहे. त्रिपुरामध्ये भाजपा-आयपीएफटी, डावे-काँग्रेस आघाडी आणि माणिक्य देबबर्मा यांच्या टिपरा मोथा या तीन पक्षांमध्ये त्रिकोणी लढत आहे.. त्रिपुरामध्ये मतमोजणीसाठी एकूण 25,000 सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.
-
Nagaland Elections 2023 Result Live : भाजपा- एनडीपीपीकडे 40 जागांची आघाडी
नागालँडमध्ये 16 मतमोजणी केंद्रांवर राज्य आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस बल तैनात आहे. त्यांनी त्रिस्तरीय सुरक्षा दिली आहे. भाजपा- एनडीपीपी 40, काँग्रेस 2 आणि एनपीएफ 16 जागांवर आघाडीवर आहे.
-
Nagaland Elections 2023 Result Live : नागालँडमध्ये NDPP युतीची मुसंडी
नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत ही भाजपचा वरचष्मा
विधानसभेच्या 60 जागांवर NDPP चा कलानुसार दबदबा
34 जागांवर NDPP ची आगेकूच, मग सत्ता येणार कोणाची?
भाजपही NDPP युतीचा घटक, भाजपचं सेव्हन सिस्टरमधील स्वप्न सत्यात उतरणार?
-
Nagaland Election 2023 Result Live : नागालँडमध्ये कमळ फुलणार ?
ईशान्य भारतातील तीन राज्यांसाठी 27 फेब्रुवारीला एकूण 85.79 टक्के मतदान झालं. एक्झिट पोलमधून भाजपा आघाडी नागालँडमध्ये सत्ता कायम टिकवेल. असा अंदाज बांधण्यात आला आहे. नागालँडमध्ये भाजपा-NDPP आघाडीला 60 पैकी 42 जागा मिळतील असा अंदाज आहे. नागा पीपल्स फ्रंटला 6 जागा मिळू शकतात.
-
Tripura Election Result Live : भाजपाकडे मोठी आघाडी
60 सदस्यांच्या त्रिपुरा विधानसभेत भाजपा 38, काँग्रेस 9, टीएमपी 3, टीएमसी 0 आणि अन्य 2 जागांवर आघाडीवर आहेत.
-
Tripura Election Result : त्रिपुरामध्ये सुरुवातीचे कल, भाजपा बहुमताच्या दिशेने
त्रिपुरात पोस्ट वॅलेट मतांची मोजणी सुरु आहे. यात भाजपा आघाडीवर आहे. सुरुवातीचे काल हाती आलेत, त्यात 33 सीटवर भाजपा आघाडीवर आहे. लेफ्ट 4, टीएमपी 3 जागांवर आघाडीवर आहे..
-
Meghalaya Election 2023 Result LIVE : मेघालयात कोणाचे येणार राज्य
मेघालयात भाजप 2 जागांवर पुढे
NPP ने 7 जागांवर घेतली आघाडी
काँग्रेसची 1 जागेवर आगेकूच
एकूण 375 उमेदवारांचा आज होणार फैसला
भाजप आणि काँग्रेसचे 60 उमेदवार मैदानात
एनपीपीचे 57 उमेदवारही रणांगणात
-
Nagaland Election Result : नागालँडमध्ये भाजपाला आघाडी
नागालँडमध्ये भाजपाला 4 जागांवर भाजपाला आघाडी मिळाली आहे. एनपीएफ दोन सीटवर आघाडीवर आहे. काँग्रेसच खात अजून उघडलेलं नाही.
-
त्रिपुरात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार ?
काँग्रेस-डावे सत्तेत परतणार का?
काय आहे जनतेच्या मनातील कौल
जनतेने कोणाच्या पारड्यात टाकले वजन
त्रिपुराचे निकाल कोणाला धक्का देणार
मतगणना सुरु, सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने मारली मुसंडी
अनेक जागांवर भाजपच्या उमेदवारांनी घेतली मोठी आघाडी
टीएमसी आणि इतर पक्षांचे उमेदवारही काही जागांवर पुढे
-
१० हजाराच्या फरकाने धंगेकर कसबा पोटनिवडणूक जिंकतील
१० हजाराच्या फरकाने धंगेकर कसबा पोटनिवडणूक जिंकतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी व्यक्त केला विश्वास
-
त्रिपुरात भाजपची आघाडी
भाजपने घेतली २२ जागांवर आघाडी
डवे पक्ष दोन जागांवर पुढे
-
त्रिपुरामध्ये सुरुवातीचा अंदाज धडकला
भारतीय जनता पक्षाने घेतली आघाडी
त्रिपुरात 15 जागांवर भाजपची आघाडी
तर TMP ची 3 जागांवर आगेकूच
-
त्रिपुरामध्ये भाजप पक्ष कार्यालयात पूजा
आम्ही पक्ष कार्यालयात पूजा केली आणि माता त्रिपुरेश्वरीचा आशीर्वाद घेतला
त्रिपुरामध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, आम्हाला बहुमत मिळेल
त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष राजीव भट्टाचार्जी यांचं वक्तव्य
“We performed puja at the party office today and took blessings of Mata Tripureshwari. BJP will return to power in Tripura. We will get a majority,” says Tripura BJP president Rajib Bhattacharjee ahead of counting of votes for #TripuraAssemblyElections2023 pic.twitter.com/neT0r1tK6r
— ANI (@ANI) March 2, 2023
-
त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
अरुणाचल प्रदेशातील लुमला विधानसभा मतदारसंघ, रामगड (झारखंड), इरोड पूर्व (तमिळनाडू), सागरदिघी (पश्चिम बंगाल)
या जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचीही मजमोजणी सुरू
-
nagaland election result: नगालँडमध्ये 183 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज
नागालँडमध्ये एकूण 183 उमेदवार उभे होते
राज्यातील 59 जागांवर मतदान झालं होतं
तर एका जागेवर भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला होता
राज्यात एकूण 13 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता
राज्यात 82.42% टक्के मतदान झालं होतं
-
meghalaya election result: मेघालयात 74.32% मतदान झालं होतं, आज निकाल कुणाच्या बाजूने?
मेघालयात 60 जागांपैकी 59 जागांवर मतदान झालं होतं
21.6 लाख मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता
राज्यातील 369 मतदारांच्या भाग्याचा फैसला आज होणार आहे
यात एकूण 36 महिला उमेदवार आहेत
27 फेब्रुवारी रोजी 74.32% मतदान झालं होतं
एकूण 3,419 मतदान केंद्रांवर मतदान झालं होतं
यातील 640 मतदान केंद्र असुरक्षित तर 323 केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले होते
-
tripura election result live: त्रिपुरात 60 जागांसाठी 81% हून अधित मतदान झाले होते
त्रिपुराच्या 60 विधानसभा जागांसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं
संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 81.1 टक्के मतदान झालं होतं
एकूण 3337 मतदान केंद्रांवर मतदान झालं होतं
यातील 1,100 मतदान केंद्र संवेदनशील आणि 28 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील होते
या निवडणुकीत एकूण 259 उमेदवार उभे आहेत
-
नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा कुणाचे? आज फैसला
पूर्वोत्तर राज्य असलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत
आज सकाळी 8 वाजता या तिन्ही राज्यात मतमोजणी होईल, त्यानंतर दुपारपर्यंत या राज्यांचं चित्रं स्पष्ट होणार आहे
एक्झिटपोलच्या अंदाजानुसार त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपची सत्ता येणार आहे
तर मेघालयमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार आहे.
Published On - Mar 02,2023 6:39 AM