पिले पिले ओ मोरे जानी… बिहारमध्ये दारूच्या नशेत पकडले गेल्यास तुरुंगवारी नाही; नितीश सरकारचा मोठा निर्णय
दारू पिऊन पकडले गेल्यास आता तळीरामांना तुरुंगाची हवा खावी लागणार नाही. हं हं... वाचून आनंदाने उड्या मारू नका. हा नियम फक्त बिहारमध्ये राहणाऱ्यांनालागू असणार आहे. दारूच्या नशेत पकडले गेल्यास तळीरामांना अटक न करण्याचा निर्णय नितीश कुमार सरकारने घेतला आहे.
पाटणा: दारू पिऊन पकडले गेल्यास आता तळीरामांना तुरुंगाची हवा खावी लागणार नाही. हं हं… वाचून आनंदाने उड्या मारू नका. हा नियम फक्त बिहारमध्ये (bihar) राहणाऱ्यांना लागू असणार आहे. दारूच्या नशेत पकडले गेल्यास तळीरामांना अटक न करण्याचा निर्णय नितीश कुमार (nitish kumar) सरकारने घेतला आहे. मात्र, त्यासाठी काही नियम आणि अटीही ठेवल्या आहेत. दारू माफियांचं नाव सांगितल्यास दारूच्या नशेत असलेल्यांना अटक करण्यात येणार नाही. म्हणजेच दारू माफियांना अटक केल्यावर दारू पिणाऱ्यांना तुरुंगात जावं लागणार नाही. तसा निर्णयच बिहारच्या नितीश कुमार सरकारने घेतला आहे. राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कार्तिकेय धनजी यांनी दिली आहे. त्यामुळे तुरुंगात (jail) जायचं नसेल तर दारु माफिया, दारुचे अड्डे, बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांचे धंदे हे तळीरामांना पोलिसांना सांगावे लागणार आहेत. ही माहिती नाही दिल्यास मात्र, त्यांची खैर राहणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
बिहारच्या तुरुंगांमध्ये तळीरामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आणि मद्य निषिद्ध विभागाला या बाबतचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
38 लाख 72 हजार 645 लीटर दारू जप्त
बिहार सरकारने नोव्हेंबर 2021मध्ये आकडे जारी केले होते. त्यामुळे लोकही आश्चर्य चकीत झाले होते. जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2021 पर्यंत छापेमारी करून राज्यात एकूण 49 हजार 900 लोकांना अटक करण्यात आली होती. त्यात तळीराम आणि दारू तस्करांचाही समावेश होता. यावेळी 38 लाख 72 हजार 645 लीटर दारू जप्त करण्यात आली होती.
जामिनासाठीच्या याचिकांचा ढीग
दारुबंदीच्या प्रकरणामुळे कोर्टातही अनेक प्रकरणं आली होती. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. त्यावेळी जामिनासाठीच्या याचिकांचा ढिग पाहून सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली होती. या याचिकांवर येत्या 8 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच बिहार सरकारने आता तळीरामांना अटक न करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या:
CCTV | बाईकला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात, पाच सेकंदात गाडी सात वेळा पलटी