Nitish Kumar : पोरांनी पोरांशींच लग्न केलं तर कोणी कसं जन्माला येईल?; समलैंगिकतेवरून नितीश कुमार यांनी फटकारले

Nitish Kumar : यावेळी नितीश कुमार यांनी आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दिवसातील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी त्यांनी मुलींशी संबंधित एक रोचक माहिती दिली. जेव्हा आम्ही इंजिनीयरिंग महाविद्यालयात शिकत होतो.

Nitish Kumar : पोरांनी पोरांशींच लग्न केलं तर कोणी कसं जन्माला येईल?; समलैंगिकतेवरून नितीश कुमार यांनी फटकारले
पोरांनी पोरांशींच लग्न केलं तर कोणी कसं जन्माला येईल?; समलैंगिकतेवरून नितीश कुमार यांनी फटकारलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 2:16 PM

पटणा: मुलाने मुलाशीच लग्न केलं तर कोणी कसं जन्माला येईल? असा सवाल करत मुख्यमंत्री नितीश कुमार (nitish kumar) यांनी समलैंगिकतेच्या मुद्द्यावरून फटकारले. पटणा येथील मगध (magadh) महिला महाविद्यालायीतल वसतीगृहाचं उद्घाटन नितीश कुमार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. अरे, लग्न (marriage) झाल्यावरच मुलंबाळं होतील ना. मी असेल किंवा इथला कोणीही व्यक्ती असो आईमुळेच जन्माला आलो ना. की आईच्या शिवाय जन्माला आलोय. स्त्रीशिवाय जन्माला आलोय का? मग अशावेळी पोरा पोरांनी लग्न केलं तर कोण जन्माला येणार? लग्न केल्यावर पोरंबाळं जन्माला येतात, असं नितीशकुमार म्हणाले. नितीश कुमार यांनी आपल्या मिश्किल अंदाजात हा सवाल केला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली. नितीश कुमार यांनी आपल्या या विधानातून समलैंगिकतेला विरोधच केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळी नितीश कुमार यांनी आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दिवसातील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी त्यांनी मुलींशी संबंधित एक रोचक माहिती दिली. जेव्हा आम्ही इंजिनीयरिंग महाविद्यालयात शिकत होतो. त्यावेली महाविद्यालयात एकही विद्यार्थीनी शिकत नव्हती, असं नितीश कुमार म्हणाले. एखाद्या दिवशी एखादी महिला कॉलेजात आली तर अख्खं कॉलेज तिला एकटक पाहायचं, अशी त्याकाळातील परिस्थिती होती, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

नितीशकुमार रमले आठवणीत

आम्ही जेव्हा इंजिनीयरिंग महाविद्यालयात शिकत होतो. तेव्हाच्या आणि आताच्या काळात खूप फरक पडला आहे. कारण आजच्या काळात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण खूप वाढलं आहे, असं ते म्हणाले. नितीश कुमार यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील हा किस्सा जेव्हा ऐकवला तेव्हा एकच हशा पिकला. विद्यार्थीनींनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं.

असं आहे वसतीगृह

राज्य सरकारने 31.8 कोटी रुपये खर्च करून हे वसतीगृह बांधले आहे. या वसतीगृहात प्रत्येक मजल्यावर 18 खोल्या आहेत. 16 वॉशरूम आहेत. आणि 12 बाथरूम आहे. एका खोलीत तीन विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना सर्व क्षेत्रात संधी मिळायला हवी, असं नितीश कुमार यांनी सांगितलं. महिलासांठी आमच्या सरकारने चांगलं काम केलं आहे. इंजिनीयरिंग आणि मेडिकल कॉलेजतील सर्व कोर्समध्ये स्त्रियांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.