Ajit Doval : NSA डोवाल Action मोडमध्ये, टीममध्ये केले दोन मोठे बदल

Ajit Doval : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू अशी NSA अजित डोवाल यांची ओळख आहे. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक सारख्या मोठ्या निर्णयांमध्ये अजित डोवाल यांची महत्त्वाची भूमिका होती. हेच अजित डोवाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी संभाळत आहेत. देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

Ajit Doval : NSA डोवाल Action मोडमध्ये, टीममध्ये केले दोन मोठे बदल
ajit doval
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 11:01 AM

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. देशाच्या नॅशनल सिक्युरिटीमध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. त्यांनी NSCS च्या (National Security Coordination Secretariat) टीममध्ये दोन मोठे बदल केले आहेत. इंटेलिजेंस ब्युरोचे स्पेशल डायरेक्टर आणि 1990 बॅचचे IPS टीवी रविचंद्रन यांना भारताचे नवीन डेप्युटी NSA म्हणून नियुक्त केलं आहे. 1990 बॅचचे IFS पवन कपूर यांनाही डेप्युटी NSA बनवण्यात आलं आहे. परदेशात भारताचे वेगवेगळे मिशन्स, परराष्ट्र मंत्रालय आणि नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयातही त्यांनी काम केलय.

पवन कपूर यांनी लंडन राष्ट्रमंडल सचिवालयात आंतरराष्ट्रीय सिविल सेवक म्हणून काम केलं आहे. अलीकडेच डेप्युटी एनएसए विक्रम मिस्री परराष्ट्र सचिव बनवण्यात आलं आहे. सध्या वरिष्ठ डेप्युटी एनएसए राजिंदर खन्ना यांना प्रमोट करुन एडिशनल NSA बनवण्यात आलं आहे. एनएससीएसमध्ये तीन डेप्युटी एनएसए आणि एक एडीशनल एनएसए आहे. पीएम मोदी यांनी अजित डोवाल यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नेमणूक केली. पीएम मोदी यांच्या दोन कार्यकाळातही डोवालच देशाचे NSA होते.

ते रॉ च्या ऑपरेशन डेस्कचे इंचार्ज

NSCS मध्ये या महत्त्वपूर्ण नियुक्त्यांनंतर NSA अजित डोवाल आता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर पीएम मोदी यांची मदत करण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र असतील. अंतर्गत सुरक्षेसह अन्य मुद्दे एडीशनल एनएसए राजिंदर खन्ना संभाळतील. राजिंदर खन्ना रिसर्च एंड एनालिसिस विंग सर्विस (RAWS) चे 1978 बॅचचे अधिकारी आहेत. खन्ना डिसेंबर 2014 ते डिसेंबर 2016 पर्यंत रिसर्च एंड एनालिसिस विंगचे (RAW) प्रमुख होते. ते रॉ च्या ऑपरेशन डेस्कचे इंचार्ज होते. ते पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधी विषयाचे तज्ज्ञ मानले जातात.

NSCS च्या ऑपरेशनची जबाबदारी अजित डोवाल यांच्या खांद्यावर

जानेवारी 2018 मध्ये डेप्युटी NSA पदावर नियुक्त झालेल्या राजिंदर खन्ना यांनी आधी टेक्नोलॉजी एंड इंटेलिजेंस (T&I) सेक्शनच नेतृत्व केलय. 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी टीवी रविचंद्रन सध्या इंटेलिजेंस ब्युरोमध्ये स्पेशल डायरेक्टर आहेत. दक्षिण भारताची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ते ऑगस्ट 2023 मध्ये रिटायर होणार होते. दुसरे डेप्युटी एनएसए पंकज सिंह आहेत. जानेवारी 2023 मध्ये दोन वर्षांसाठी त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आलं. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी संबंधित विषय हाताळते. NSCS च्या ऑपरेशनची जबाबदारी अजित डोवाल यांच्या खांद्यावर आहे.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.