जंगलात सापडला मुलीचा मोबाईल; तिथलं दृश्य पाहताच पोलिसांची उडाली भंबेरी, बॉयफ्रेंडसोबत घरातून होती पळाली
Girl Runaway with Boyfriend : प्रियकरासोबत सुंदर आयुष्याची स्वप्न घेऊन ती गुपचूप घरातून पळाली. एका जंगलात तिचा मोबाईल फोन सापडला. त्याठिकाणची दृश्य आणि परिस्थिती पोलिसांनी हादरवणारी होती. काय घडलं त्या दिवशी जंगलात?

कुमार वयातील मुला-मुलींना आकर्षणातून प्रेम होते. पण कोण चांगलं, कोण वाईट याचं भान त्यांना नसतं. अशीच एक तरुणी प्रियकरासोबत सुंदर आयुष्याची स्वप्न घेऊन गुपचूप घरातून पळाली. तिच्या घराचाना मोठा मानसिक आघात बसला. पण ती कुठं आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता. एक दिवस एक क्ल्यू मिळाला. एका जंगलात तिचा मोबाईल फोन सापडला. त्याठिकाणची दृश्य आणि परिस्थिती पोलिसांनी हादरवणारी होती. काय घडलं त्या दिवशी जंगलात?
एका आरोपीला अटक
ओडिशामधील संबलपूर येथील ही घटना आहे. ही मुलीचा अनेक दिवसांपासून शोध सुरू होता. पोलीस तिचा शोध घेत होते. अचानक एक दिवस तिचा मोबाईल एका जंगलात मिळाला. त्याठिकाणची एकूणच स्थिती चमत्कारीक होती. तिथंच थोड्या अंतरावर या 17 वर्षीय मुलीचे सडलेला मृतदेह सापडला. ही मुलगी 20 मार्चपासून बेपत्ता होती. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.




20 हजार रुपये घेऊन फरार
बरगढ जिल्ह्यातील एका गावातील ही मुलगी होती. प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी तिने घरातून 20 हजार रुपये रोख चोरले. नंतर ती प्रियकरासोबत पळून गेली. 20 मार्च रोजी ती घरातून पळाली होती. तिचा मृतदेह पुढे संबलपूर जवळील हिराकुंड परिसरातील जंगलात मिळाला. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. पण ती न मिळाल्याने त्यांनी बरगढ टाऊन पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दिली होती.
पोलिसही तिचा शोध घेत होते. पोलिसांना अखेर तिचा मोबाईल क्रमांक सुरू असल्याचे कळाले. तिचे लोकेशन जंगलात एक किलोमीटर आत दाखवत होते. घटनास्थळावर तिचे सडलेला मृतदेह आढळला. तिच्या अंगावर खोल जखमा होत्या. तिच्यावर बलात्कार करून तिची क्रूर हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणात अजून काही व्यक्तींचा समावेश असल्याची शंका पोलिसांना आहे. लवकरच इतर आरोपींना अटक करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोपींना कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनसमोर गर्दी जमली होती.