Train Insurance : केवळ 35 पैशांत 10 लाखपर्यंतचा विमा, तिकीट बुक करताना तुम्ही पण ही चूक करता का

Train Insurance : तिकीट बुक करताना काळजी घेतल्यास केवळ 35 पैशांत 10 लाखपर्यंतचा विमा मिळू शकतो, काय आहे ही प्रक्रिया.

Train Insurance : केवळ 35 पैशांत 10 लाखपर्यंतचा विमा, तिकीट बुक करताना तुम्ही पण ही चूक करता का
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 7:20 PM

नवी दिल्ली : ओडिशातील बालासोरमध्ये रेल्वेचा मोठा अपघात (Odisha Train Accident) झाला. या अपघातामुळे देश हादरला. या अपघातात जवळपास 280 प्रवाशांना प्राण गमवावे लागले. तर 900 हून अधिक जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातत मयतांच्या आयुष्याची किंमत करता येणार नाही. पण यामध्ये अनेकांनी त्यांच्या कुटुंबातील आधार गमावला आहे. त्यांच्यासमोर उद्याच्या जगण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. सरकारी मदत तर मिळेल. पण इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) एक मोठी सुविधा प्रवाशांना देते. आयआरसीटीसी प्रवाशांना विम्याचे संरक्षण देते. अवघ्या काही पैशात 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.

याकडे नको दुर्लक्ष लांब पल्ला गाठायचा असेल. देशात एका टोकाहून दुसरीकडे जायचे असेल तर नागरिक रेल्वेला सर्वाधिक पसंती देतात. रेल्वेतून प्रवास करण्याचे फायदे आणि मजा काही औरच आहे. डिजिटलीकरणामुळे आता घरबसल्या रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येते. तुमची सीट निवडीपासून ते जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. तिकीट बुक करताना प्रवाशांना रेल्वे विम्याचा पर्याय देते. त्यामुळे प्रवासात काही वाईट घडल्यास, अपघात झाल्यास अशा परिस्थितीत विम्याचे संरक्षण मिळते.

सर्वात स्वस्त विमा कवच आयआरसीटीसी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी 35 पैशांत 10 लाखपर्यंतची नुकसान भरपाई देते. लाखो रुपयांचे विमा संरक्षण अगदी काही पैशांत मिळते. पण अनेक जण तिकीट बुक करताना या पर्यायकडे दुर्लक्ष करतात. हा पर्याय असल्याने प्रवाशांचे त्याकडे दुर्लक्ष होते. रेल्वे विभाग सर्वात स्वस्त विमा संरक्षण देते.

हे सुद्धा वाचा

असा मिळतो पर्याय जेव्हा तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाईटच्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट बुक करता, तेव्हा पेमेंट प्रोसेसवेळी तुम्हाला प्रवास विम्याचा पर्याय समोर दिसतो. जर तुम्ही हा पर्याय निवडला तर विमा संरक्षण मिळते. प्रवाशांना अवघ्या 35 पैशांत 10 लाखपर्यंतची भरपाई मिळते. विशेष म्हणजे एका पीएनआर(PNR) माध्यमातून जेवढ्या प्रवासांचे तिकीट बुकिंग होईल. त्यांना हा विमा लागू असतो.

असा मिळतो विमा इंडियन रेल्वे आणि टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार, केवळ 35 पैशांत 10 लाखपर्यंतची भरपाई मिळते. या विम्यात आंशिक अपंगत्व, अंपगत्व, गंभीर जखम, रुग्णालयात नेण्याचा खर्च, मृत्यू या सर्वांचा समावेश असतो. वेगवेगळ्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम देण्यात येते.

अशी मिळते मदत

  • आयआरसीटीसी विमा संरक्षण देते
  • तिकीट बुक करताना विमा पर्याय निवडावा लागतो
  • गंभीर दुखापत झाल्यास 2 लाखा रुपयांपर्यंतची मदत
  • आंशिक अपंगत्व आल्यास 7.5 लाखांचे संरक्षण
  • अपंगत्व, मृत्यू ओढावल्यास 10 लाखांची भरपाई
  • मृतदेह वाहनातून नेण्यासाठी 10 हजारांची मदत

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.