Omicron संसर्गाच्या वाढत्या वेगानं धडकी, दिल्लीनं महाराष्ट्राला मागं टाकलं, देशाची रुग्णसंख्या 781 वर

देशातील 21 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गातून मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 241 इतकी झाली आहे. देशात गेल्या चोवीस तासात 9 हजार 195 कोरोना रुग्ण आढळले असून सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 44.6 टक्के रुग्ण वाढले आहेत.

Omicron संसर्गाच्या वाढत्या वेगानं धडकी,  दिल्लीनं महाराष्ट्राला मागं टाकलं, देशाची रुग्णसंख्या 781 वर
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 12:37 PM

नवी दिल्ली: भारतातील ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. ओमिक्रॉनचा वाढता वेग (Omicron cases) चिंतेचं कारण बनला आहे. देशात आतापर्यंत 781 ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. नवी दिल्लीत (New Delhi) 238 रुग्णांची नोंद झालीय. त्या पाठोपाठ महाराष्ट्रात (Maharashtra) 167 रुग्ण आढळले आहेत. देशातील 21 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गातून मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 241 इतकी झाली आहे. देशात गेल्या चोवीस तासात 9 हजार 195 कोरोना रुग्ण आढळले असून सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 44.6 टक्के रुग्ण वाढले आहेत.

नवी दिल्लीत सर्वाधिक रुग्ण तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

ओमिक्रॉनच्या सर्वाधिक बाधितांची नोंद ही नवी दिल्लीमध्ये झाली आहे. नवी दिल्लीत 238 बाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 57 रुग्ण बरे झाले आहेत. तर महाराष्ट्रात 167 रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं यलो अलर्ट जारी केल्यानं शाळा, महाविद्यालय, सिनेमागृह आणि जीम तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुकानं, सरकारी वाहनांवर काही प्रमाणात प्रतिंबंध लावण्यात आले आहेत.

राज्यनिहाय ओमिक्रॉन बाधितांची संख्या

देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या781 वर पोहोचली असून सर्वाधिक रुग्ण नवी दिल्लीत आढळले आहेत. नवी दिल्लीत 238, महाराष्ट्रात 167, केरळ 65 आणि गुजरातमध्ये 73 रुग्ण आढळले आहेत. तेलंगणा 62, राजस्थान 46, कर्नाटकमध्ये34, तामिळनाडूमध्ये 34, हरयाणा 12, पश्चिम बंगाल 11, मध्य प्रदेश 9, ओडिशा 8, आंध्र प्रदेश 6, उत्तराखंड 4, चंदीगड 3, जम्मू काश्मीर 3, उत्तर प्रदेश 2, गोवा 1, हिमाचल प्रदेश1, लडाख 1 , मणिपूरमध्ये एका रुग्णाची नोंद झालीय.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत नोंदवली गेलीय. मुंबई 84, पिंपरी चिंचवड 19, पुणे जिल्हा 17, पुणे महापालिका 7, ठाणे महापालिका 7 , सातारा 5, उस्मानाबाद 5 आणि पनवेल महापालिका क्षेत्रात 5 रुग्णांची नोंद झालीय. तर, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. तर, बुलडाणा, लातूर, अकोला, अहमदनगर, वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पालघर, भिवंडीमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झालीय.

इतर बातम्या:

कोवॅक्सिन लस 15 ते 18 वयोगटातील मुलांना देणार, डॅा. वसंत खडतकर यांची माहिती

Corona vaccination | मुलांच्या लसीकरणासाठी 1 जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात

Omicron cases in India reach to 781 in the country Delhi recorded 238 case Maharashtra follow with 167 cases

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.