AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमिक्रॉनचा 89 देशांत शिरकाव, ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत 93 हजार कोरोनाबाधित!

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हेरियंटनं कहर केलाय. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक 93 हजार 45 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 111 कोरोनाबळी गेलेत. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत भयावह अशी वाढ होत आहे.

ओमिक्रॉनचा 89 देशांत शिरकाव, ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत 93 हजार कोरोनाबाधित!
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 9:38 PM

मुंबई : कोरोना विषाणूचा (Corona Virus) नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचं (Omicron) नवं संकट जगासमोर उभं राहिलं आहे. अशावेळी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हेरियंटनं कहर केलाय. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक 93 हजार 45 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 111 कोरोनाबळी गेलेत. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत भयावह अशी वाढ होत आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर

>> बुधवारी 78 हजार 610 नवे कोरोनाबाधित >> गुरुवारी 88 हजार 376 नवीन करोना रुग्णांची भर >> शुक्रवारी 93 हजार 45 कोरोनाबाधित >> आठवडाभरात तब्बल 4 लाख 77 हजार 229 कोरोना रुग्ण

लंडनमध्ये तब्बल 80 टक्के रग्ण ओमिक्रॉनबाधित

ओमिक्रॉननं लंडन आणि स्कॉटलँडमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटलाही मागे सोडलंय. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा पाच पट अधिक आहे. लंडनमध्ये तर तब्बल 80 टक्के रग्ण ओमिक्रॉनमुळे बाधित झाल्याचं आढळून आलं आहे. ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी प्रभावी असल्याचे कोणतेच पुरावे नाहीत, ब्रिटिश संशोधकांच्या दावानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे युरोपात आता अजून कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे एकूण 14 हजार 909 रुग्ण आढळले आहेत. तर 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण ओमिक्रॉनबाधित असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव डेल्टापेक्षा वेगानं होत असल्यानं रुग्णालायत ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढू लागलीय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ओमिक्रॉन संसर्गाचे रुग्ण 38.6 टक्के इतके आढळून येतायेत. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यास लस 0 ते 30 टक्के प्रभावी आहे, तर बुस्टर डोसनंतर लस 55 ते 80 टक्के प्रभावी असल्याचा दावा ब्रिटनच्या तज्ज्ञांनी केलाय.

फ्रान्सकडून ब्रिटनसोबतची सीमा सील, त्यामुळे

  • ब्रिटन आणि फ्रान्समध्ये केवळ अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सुरू राहणार
  • हजारो नागरिकांची फ्रॉन्समध्ये जाण्यासाठी गर्दी
  • फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी बुस्टर डोसही देण्यास सुरुवात

जर्मनी पाचव्या लाटेच्या उंबरठ्यावर, अमेरिकेत सावधानतेचा इशारा

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाच जर्मनीही कोरोनाच्या पाचव्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाची लाट रोखण्यासाठी लशीच्या बुस्टर डोसची मोहिम राबवण्यात येतेय. युरोपात कोरोनानं दाणादाण उडवली असताना तिकडे अमेरिकेतही कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढतोय. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या देशातील नागरिकांना ओमिक्रॉनपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. लस न घेतल्यास हिवाळ्यात कोरोनामुळे मृत्यूही ओढावू शकतो, असा इशारा बायडेन यांनी दिलाय.

कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्यानं न्यूयॉर्कमधील कॉलेज बंद करण्यात येत आहेत. कॉरनेल विद्यापीठात तब्बल 700 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर विद्यापीठ परिसल सील करण्यात आलाय. तसेच विद्यापीठाची अंतिम परीक्षाही ऑनलाईनच घेतली जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 17 वर्षे वयोगटातील सर्वांनाच बूस्टर डोस देण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केली आहे.

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग आणि ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे कोरोना चाचणी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यानं कॅनडानं त्यांच्या नागरिकांना गरज नसेल तर आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका पर्यटन उद्योगाला

कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका पर्यटन उद्योगाला बसला आहे. इटली आणि बोत्सवानामध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. इटलीच्या जीडीपीमध्ये पर्यटन व्यवसायाचा 5 टक्के वाटा आहे. दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियामध्ये कोरोनाची लाट सुरू आहे. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय. दरवर्षी बोलिव्हियामध्ये 12 लाख पर्यटक येत असतात पण कोरोनामुळे यावर्षी फक्त 30 हजार पर्यटक आल्यानं मोठं आर्थिक संकट ओढावलंय.

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बफर झोनची निर्मिती करण्यात आलीय. सीमेवरील भागात स्थानिक प्रशासनाला कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आलेत.

दीड ते तीन दिवसात ओमिक्रॉनचा संसर्ग दुप्पट

ओमिक्रॉननं आतापर्यंत तब्बल 89 देशांत शिरकाव केलाय. सामुहिक संसर्ग झालेल्या देशात अवघ्या दीड ते तीन दिवसात ओमिक्रॉनचा संसर्ग दुप्पटीनं फैलावत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्था बळकट आणि गर्दी टाळण्याचं आवाहन WHO नं केलंय.

भारतात ओमिक्रॉनबाधितांची संख्या 100 पेक्षा अधिक

भारतातही ओमिक्रॉनबाधिताची संख्या शंभरपेक्षा जास्त झालीय. केरळ आणि महाराष्ट्रासह इतर 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास भारतातही ब्रिटनसारखं कोरोनाचा विस्फोट होण्याची भिती आहे. ब्रिटनप्रमाणेच भारतात कोरोनाचा कहर झाल्यास दररोज तब्बल 14 लाख कोरोनाबाधित आढळून येतील, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही. के. पॉल यांनी दिलाय. त्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर मास्क लावा, लस घ्या आणि सामाजिक अंतराचे पालन करणं गरजेचं आहे.

इतर बातम्या :

‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.