Omicron Update: ओमिक्रॉनमुळेच देशात येणार तिसरी लाट? आधीपेक्षा तीव्र की सौम्य? तज्ज्ञांचा अंदाज वाचायलाच हवा!

युरोपियन देशात ओमिक्रॉनचा उद्रेक पाहता भारतातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ओमिक्रॉनच कारणीभूत ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Omicron Update: ओमिक्रॉनमुळेच देशात येणार तिसरी लाट? आधीपेक्षा तीव्र की सौम्य? तज्ज्ञांचा अंदाज वाचायलाच हवा!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 2:31 PM

जगात ओमिक्रॉन रुग्णसंख्येचा (Omicron) विस्फोट होताना पहायला मिळतोय तर भारतातही या रुग्णांची संख्या हळू हळू वाढताना दिसून येत आहे.  ओमिक्रॉनमुळेच देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ओमिक्रॉनचा सर्वात पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आला होता. त्यानंतर हा व्हेरिएंट जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलाय. सध्या युरोपीयन देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झालेली दिसून येत असून यातील बहुतांश रुग्ण ओमिक्रॉनग्रस्त (Omicron Patient)  असल्याचे समोर आले आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला तिसऱ्या लाटेचा उद्रेक?

नॅशनल कोव्हिड-19 सुपरमॉडेल कमिटीचे सदस्य आणि हैदराबाद येथील आयआयटी प्रोफेसर एम विद्यासागर यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले, भारतात पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अर्थात लसीकरणामुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही लाट सौम्य स्वरुपाची असेल. एप्रिल-मे दरम्यान दुसऱ्या लाटेत समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ही संख्या कमी असेल. भारत सरकारने 1 मार्चपासून देशात लसीकरणाची सुरुवात केली होती. डेल्टा व्हेरिएंटच्या फैलावाचाही हाच काळ होता. त्यावेळी फ्रंटलाइनवर काम करणाऱ्यांनाच फक्त लस देण्यात आली होती. सामान्य नागरिकांचे लसीकरण झालेले नव्हते. त्यामुळेच डेल्टा व्हेरिएंटपायी दुसऱ्या लाटेने एवढे गंभीर स्वरुप धारण केले होते.

लसीकरणामुळे तिसरी लाट सौम्य असणार

विद्यासागर म्हणाले, “आता देसातील 75-80 नागरिक सुरक्षित आहेत. कारण 85 टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे तर 55 टक्के नागरिकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी या नागरिकांच्या शरीरात प्रतिकार शक्ती तयार झाली आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असतील. तसेच दुसऱ्या लाटेमुळे आपल्या प्रशासनाकडे चांगला अनुभवदेखील आहे. त्यामुळे कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.”

डेल्टाच्या तुलनेत तिप्पट वेगाने प्रसार

नवीन वर्षाच्या निमित्ताने भारतातील विविध राज्यांमध्ये पार्ट्या आणि उत्सवांवर निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे. कारण केंद्र सरकारने राज्यांना तसा इशाराच दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमक्रॉनचा प्रसार अधिक वेगाने होतो. त्यामुळे ओमिक्रॉनमुळेच देशात तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

… तर रोज 2 लाख पेशंट आढळतील

हैदराबादमध्ये आयआयटी प्रोफेसर असलेले एम विद्यासागर यांनी तिसऱ्या लाटेतील आणखी एक गंभीर शक्यता वर्तवली. ते म्हणतात, तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या दोन गोष्टींवर अवलंबून असेल. पहिली म्हणजे डेल्टा व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. त्याद्वारे ओमिक्रॉनचा किती प्रमाणात सामना केला जातोय, हे पहावे लागेल. तसेच लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर जी प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, ती ओमिक्रॉनचा कसा सामना करते, हेही दिसून येईल. या दोन बाबींवर रुग्णांची संख्या अवलंबून असेल. तसेच देशात तिसरी लाट आली आणि अत्यंत वाईटात वाईट स्थिती उद्भवली तरीही भारतात दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण समोर येणार नाहीत. सामान्य स्थितीत ही संख्या 1.8 लाखांपर्यंत असू शकते. दुसऱ्या लाटेतील टोकाच्या स्थितीपेक्षा ही निम्म्यापेक्षा कमीच आहे. विद्यासागर यांनी तिसऱ्या लाटेसंबंधी वर्तवलेला हा अंदाज आहे.

इतर बातम्या-

तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का?, झाली दादांकडून चूक; सुधीर मुनगंटीवारांचे नवाब मलिकांना चिमटे कशासाठी?

ओबीसींसाठी वंचितची विधानभवनावर धडक, कार्यकर्त्यांची धरपकड, आंबेडकर आक्रमक, म्हणाले…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.