देश स्वतंत्र झाल्यानंतर ‘या’ लोकांनी पहिल्यांदाचं केलं मतदान; 77 वर्षातील ऐतिहासिक घटना

One of seven of the Shompen tribe in Great Nicobar voted first time for the Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज देशात मतदान झालं. आजच्या दिवशी देशात एका ऐतिहासिक घटनेची नोंद झाली आहे. काय आहे ही घटना? वाचा सविस्तर.....

देश स्वतंत्र झाल्यानंतर 'या' लोकांनी पहिल्यांदाचं केलं मतदान; 77 वर्षातील ऐतिहासिक घटना
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 6:33 PM

भारत… जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे आणि लोकसभा निवडणूक हा देशातला सर्वात मोठा लोकशाही उत्सव… देशात यंदा सात टप्प्यात मतदान होतंय. आज पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यंदाच्या मतदान प्रक्रियेत ऐतिहासिक घटना घडली आहे. शोम्पेन समाजाच्या लोकांनी पहिल्यांदाच मतदान केलं. या घटनेचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाली. या 77 वर्षातील ही ऐतिहासिक आणि पहिलीच घटना आहे.

शोम्पेन समाजाच्या लोकांनी यंदा पहिल्यांदा मतदान केलं आहे. या आधी त्यांनी कधीही आपलं मत दिलं नव्हतं. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरवर ‘शोम्पेन हट’ नावाने मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. या ठिकाणी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क तर बजावलाच शिवाय मतदार केंद्रावर त्यांनी फोटोही काढले. ओंगे आणि अंदमानीज लोकांनी 2019 ला पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर यंदा शोम्पेन समाजाने पहिल्यांदाच आपलं नोंदवलं आहे. 98 शोम्पेन समाजाच्या लोकांनी मतदान केलं आहे.

शोम्पेन कोण आहेत?

शोम्पेन समाज हा अंदमान आणि निकोबार बेटांवर स्थित आहे. निकोबार बेटावर या समाजाचं वास्तव्य आहे. हे लोक मंगोलियन जातीचे आहेत. या समाजाचे लोक लाजाळू स्वभावाचे असतात. शोम्पेन समाजाचे लोक शारिरिक दृष्ट्यादेखील प्रचंड कमजोर असतात. याच मुळे या लोकांना (PVTG8) समुहात त्यांना समाविष्टित केलेलं आहे. शिक्षणाचा अभाव असल्याने हा समाज अद्याप मुख्य प्रवाहात आलेला नाही. त्याचमुळे इतकी वर्षे या समाजाने मतदान केलं नव्हतं. 2011 साली झालेल्या जनगणनेत शोम्पेन समाजाच्या लोकांची संख्या 229 होती. हे लोक प्रामुख्याने शोम्पेन ही भाषा बोलतात.

आनंद महिंद्रा यांच्याकडून फोटो ट्विट

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी याबाबतची ट्विट शेअर केली. शोम्पेन समाजाच्या व्यक्तीने मतदानानंतर काढलेला फोटो आनंद महिंद्रा यांनी शेअर केला. हा फोटो माझ्यासाठी 2024 च्या निवडणुकीमधला सर्वोत्तम फोटो आहे. ग्रेट निकोबारमधील शॉम्पेन जमातीतील सातपैकी एक, ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं. लोकशाही आहे. ही एक अप्रतिम, न थांबवता येणारी शक्ती आहे, असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.