देशात अवघ्या 10 ते 15 टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज, एम्सच्या संचालकांचा दावा

कोरोनाच्या केवळ 10 ते 15 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे, तर 5 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे. (Only 10 to 15 percent of corona patients in the country need oxygen, claims the director of AIIMS)

देशात अवघ्या 10 ते 15 टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज, एम्सच्या संचालकांचा दावा
देशात अवघ्या 10 ते 15 टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 9:40 PM

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर व त्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा यामुळे देशाची चिंता वाढली असताना एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी दिलासादायी दावा केला आहे. कोरोना हा सामान्य आजार आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाच्या केवळ 10 ते 15 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे, तर 5 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे. 85 टक्के लोकांना सामान्य लक्षणे असून ते घरगुती उपाय किंवा योगा करून घरातच सात ते दहा दिवसांनी बरे होऊ शकतात, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. (Only 10 to 15 percent of corona patients in the country need oxygen, claims the director of AIIMS)

कोरोना संसर्गावर तज्ज्ञ डॉक्टरांची चर्चा

देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर आज तज्ज्ञ डॉक्टरांची वेबिनारच्या माध्यमातून चर्चा झाली. या चर्चासत्रात ‘मेदांता’चे चेअरमन डॉ. नरेश त्रेहान, ‘एम्स’च्या मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नवीत विग आणि आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. सुनील कुमार यांनी सहभाग घेतला होता. या वेळी डॉ. गुलेरिया यांच्यासह अन्य तज्ज्ञांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय सुचवले. त्याचबरोबर कोरोना झाला म्हणून घाबरून जाऊ नका, असे आवाहन केले. तसेच देशातील ऑक्सिजनचा प्रश्न पुढील 5 ते 7 दिवसांत सुटेल, अशी आशा ‘मेदांता’चे चेअरमन डॉ. त्रेहान यांनी व्यक्त केली.

गरज नसताना घरात ऑक्सिजन, रेमडेसिवीर ठेवू नका

देशात सध्या भितीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांना रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची गरज नसतानाही घरामध्ये रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन सिलिंडर्स ठेवू लागले आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या व गंभीर स्थिती बनलेल्या रुग्णांना ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग सामान्य संसर्ग आहे. जवळपास 85 ते 90 टक्के रुग्णांमध्ये ताप, खोकला, अंगदुखी, सर्दी अशी किरकोळ लक्षणे आहेत. या रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही. अशा लोकांनी घरात रेमडेसिवीर, ऑक्सिजन ठेवू नये, असे डॉ. गुलेरिया यांनी सुचवले आहे.

…तर रेमडेसिवीरचा फायदा होण्याऐवजी नुकसान होईल!

रेमडेसिवीर ही काही जादूची गोळी नाही. जे रुग्ण रुग्णालयात उपचार घेताहेत, ज्यांची प्रकृती गंभीर आहे, अशाच रुग्णांना रेमडेसिवीर द्यायला हवे, अन्यथा रेमडेसिवीरचा फायदा होण्याऐवजी नुकसान होईल. त्यामुळे रेमडेसिवीरचा गरज नसताना वापर करू नका, असा सावधगिरीचा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे. (Only 10 to 15 percent of corona patients in the country need oxygen, claims the director of AIIMS)

इतर बातम्या

रेशन देण्यात आता डिलरची मनमानी चालणार नाही, थेट ‘या’ टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार

मोठी बातमी! वैज्ञानिकांनी तयार केला ‘ऑक्सिकॉन’, दर मिनिटाला 3 लिटर ऑक्सिजन तयार होणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.