Laxman Pai Death : प्रसिद्ध चित्रकार लक्ष्मण पै यांचे निधन, अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांने गौरव
प्रसिद्ध चित्रकार आणि पद्मभूषण (Padma Bhushan) पुरस्कार सन्मानित लक्ष्मण पै यांचे निधन (Death) झाले आहे. (Laxman Pai passes away)
पणजी (गोवा) : प्रसिद्ध चित्रकार आणि पद्मभूषण (Padma Bhushan) पुरस्काराने सन्मानित लक्ष्मण पै यांचे निधन (Death) झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. लक्ष्मण पै (Laxman Pai) यांनी काल (14 मार्च) संध्याकाळी गोव्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मण पै यांना पद्मभूषण, पद्मश्री, नेहरू पुरस्कार आणि ललित कला अकादमी पुरस्कार यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. (Padma Bhushan artist Laxman Pai passes away)
“गोव्यातील एक रत्न आपण गमावला”
लक्ष्मण पै यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. “गोव्यातील प्रसिद्ध कलाकार पद्मभूषण लक्ष्मण पै यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून फार दु:ख वाटले. गोव्यातील एक रत्न आपण गमावला. कला क्षेत्रातील त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याप्रती मी मनापासून शोक व्यक्त करतो.”
Deeply saddened by the passing away of renowned Goan artist Padma Bhushan Shri Laxman Pai. Goa has lost a gem today. We will always remember his immense contribution in the field of art. My heartfelt condolences to his family. Om shanti? pic.twitter.com/9u9Y2negsL
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 14, 2021
केंद्रीय आयुष राज्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली
केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद वाय. नाईक यांनीही लक्ष्मण पै यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गोवा कॉलेज ऑफ आर्ट्सचे माजी प्राचार्य, एक उत्तम भारतीय कलाकार आणि चित्रकार पद्मभूषण लक्ष्मण पै यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून फार वाईट वाटले, असे ते म्हणाले. (Padma Bhushan artist Laxman Pai passes away)
लक्ष्मण पै यांचा अल्प परिचय
लक्ष्मण पै यांचा जन्म 21 जानेवारी 1926 रोजी गोव्यातील मडगाव येथे झाला होता. त्यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आर्ट्सचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी कलेच्या अधिक अभ्यासासाठी फ्रान्समध्ये दहा वर्षे वास्तव्य केले होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भारतासह जगभरात आयोजित करण्यात आली आहे.
त्यांना भारत सरकारने 1945 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. 1977 ते 1987 या काळात लक्ष्मण पै यांनी गोवा कॉलेज ऑफ आर्ट्सचे प्राचार्य म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 1987 मध्ये गोवा सरकारने सन्मानित केले होते. पुढे भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले. 1995 मध्ये त्यांना नेहरू पुरस्कार देण्यात आला होता. लक्ष्मण पै यांना 1961, 1963 आणि 1962 तीन वेळा ललितकला अॅकादमी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहेत.
पै यांनी पॅरिसमध्ये बराच वेळ घालवला असल्याने त्या गोष्टींचा त्यांच्या कलेवरही परिणाम होतो. मार्क चॅगल, पॉल क्ले आणि जोन मिरो यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आर्ट गॅलरी डीएजीनुसार, त्यांची कला ही भारतीय लोक कलेच्या शैलीचे प्रदर्शन करते. (Padma Bhushan artist Laxman Pai passes away)
संबंधित बातम्या :
भाजप खासदाराच्या घराबाहेर सुनेने हाताची नस कापली; मुलावर गंभीर आरोप