Pahalgam Attack : दिल्लीत संरक्षण मंत्र्यांची हाय-लेव्हल मीटिंग, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, NSA डोवालही हजर
Pahalgam Attack : दिल्लीत आज एक हाय-लेव्हल मीटिंग झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते. भारताने अजून या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलेलं नाही. सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांकडून सुरक्षा स्थितीचा त्याआधी आढावा घेणं हे एक महत्त्वाच पाऊल आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज एक उच्च-स्तरीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या मीटिंगला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, इंडियन एअर फोर्स चीफ मार्शल एपी सिंह, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी आणि नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला संपूर्ण देशासाठी मोठा धक्का आहे. देशभरातून आलेल्या 26 पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन हा हल्ला केला.
राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जम्मू-काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीसंदर्भात चर्चा करण्यात आली. आज संध्याकाळी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक होणार आहे. त्यात अधिक सविस्तरपणे या मुद्यावर चर्चा होऊ शकते. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी, नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी राजनाथ सिंह यांना सुरक्षा स्थिती संदर्भात माहिती दिली. भारताने अजून या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलेलं नाही. सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांकडून सुरक्षा स्थितीचा त्याआधी आढावा घेणं हे एक महत्त्वाच पाऊल आहे.
मास्टरमाइंड्सना संपवणं गरेजच
पेहेलगाम येथे उच्च अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. स्थानिक सुरक्षा पथकं अलर्टवर आहेत. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून संपवण्यासाठी अतिरिक्त कुमक पाठण्यात आली आहे. पेहेलगाम जवळ असलेल्या जंगलांमध्ये या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. फक्त या दहशतवाद्यांना संपवून चालणार नाही, या मागच्या मास्टरमाइंड्सना संपवणं देखील तितकचं गरजेच आहे. त्यासाठी प्रसंगी सीमा ओलांडून पाकिस्तानात स्ट्राइक करण्याची हिम्मत दाखवावी लागेल. भारताने याआधी दोनवेळा अशी हिम्मत दाखवली आहे.
‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हटलं जातं
पहलगामच्या या दहशतवादी हल्ल्यात एक नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. बैसरन खोऱ्यात हा हल्ला झाला. पहलगामच्या या भागाला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हटलं जातं. पर्यटक इथे निसर्गाच्या स्नानिध्यात मौज, मजा करत असताना हा दहशतवादी हल्ला झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.