पहलगाम प्रकरणात शरद पवार ॲक्शन मोडवर, एक फोन फिरवला अन्..; नेमकं काय केलं?
हल्ल्यादरम्यान काश्मिरी लोकांनी पर्यटकांना पूर्ण सहकार्य केले. पर्यटक सुखरूप तेथून बाहेर पडतील, यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. दरम्यान, आता पहलगाम हल्ल्याप्रकरणी खासदार शरद पवार यांनी एक कॉल केला आहे.

Sharad Pawar On Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याप्रकरणी संपूर्ण देशात सध्या संतापाचं वातावरण आहे. देशात प्रत्येक स्तरातून या क्रूर घटनेचा निषेध केला जात आहे. या हल्ल्यादरम्यान काश्मिरी लोकांनी पर्यटकांना पूर्ण सहकार्य केले. पर्यटक सुखरूप तेथून बाहेर पडतील, यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. दरम्यान, आता पहलगाम हल्ल्याप्रकरणी खासदार शरद पवार यांनी एक कॉल केला आहे. हा कॉल करून त्यांनी जम्मू-काश्मीर तसेच पहलगामची सध्याची परिस्थिती काय आहे? हे समजून घेतलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही चर्चा एका भाषणादरम्यान सांगितली आहे.
पवारांनी सांगितली जुनी आठवण
शरद पवार पुण्यात एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पहलगाममधील हल्ल्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याविषयीची एक आठवण सांगितली. “एकेकाळी काश्मीरमध्ये वाईट स्थिती झाली होती. मुळाबाळाच्या शाळा बंद झाल्या होत्या. त्या वेळेला उमर अब्दुल्ला शिकत होते. एके दिवशी मला ओमर अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुला यांनी कॉल केला आणि की मेरे बच्चे की पढाई का सवाल है, आपके पास भेजता हूँ, असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर उमरने माझ्या घरी शिक्षण पूर्ण केले. याबाबत लोकांना माहिती नाही. ओमर अब्दुल्लाचं पदवीपर्यंतचं शिक्षण माझ्या घरी असताना मुंबईत झालं. त्यामुळे त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहे,”अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
शरद पवारांनी फोन केला अन्..
“आज हेच ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला काश्मीर आणि काश्मीरमधील प्रत्येकजण भारताच्या संबंधी पाकिस्तासोबत कोणतीही तडजोड करायची नाही, अशा विचाराचा असल्याचं सांगितलं,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
काही लोकांकडून चुकीची…
काही लोक चुकीचा विषय घेऊन काम करतात. काही लोक दहशतवाला पाठिंबा देतात. काही लोकांकडून चुकीची शिकवण दिली जाते. आम्हाला सगळे धर्म, जातीसमूह एकत्र हवे आहेत. सामूहिक शक्ती हवी आहे. भारत यातून शक्तिशाली देश राहिला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जात-पात, धर्म याचा…
इथून जाताना एकच निर्णय घेऊन जायचं. काय वाटेल ते झालं तर देशाच्या ऐक्यसंबंधी तडजोड नाही. इथं आम्ही राजकारण आणणार नाही. राजकीय मतभेद असतील निवडणुका असतील. त्या वेळेला काय करायचं ते बघू. पण आज हिंदुस्तान हा एक आहे. इतर जात-पात, धर्म याचा विचार करणाऱ्यांबरोब आम्ही नाही अशी स्वच्छ भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्याच पद्धतीने आमचा निर्धार असला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी लोकांना केले.