पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी गेले कुठे? एनआयएचा तपास कुठपर्यंत पोहचला?
Pahalgam Terror Attack Terrorists: पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. एनआयएकडून मृत्यू झालेल्या पर्यटकांचे नातेवाईक, जखमी झालेले पर्यटक आणि स्थानिक लोकांची चौकशी करण्यात आली. एनआयए या प्रकरणाचा तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

Pahalgam Terror Attack Terrorists: जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यास आता सहा दिवस झाले आहे. परंतु हल्ला करणारे दहशतवादी अजूनही सापडले नाही. हल्लेखोर कुठे गेले आहे? लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. त्यानंतरही त्यांचा ठावठिकाणा अजून समजला नाही. हे दहशतवादी पाकिस्तानात पळून गेल्याचे म्हटले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थनिकांच्या पाठिंब्याने ते लपल्याची आणखी एक शक्यता व्यक्त केली जात आहे.
पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. एनआयएकडून मृत्यू झालेल्या पर्यटकांचे नातेवाईक, जखमी झालेले पर्यटक आणि स्थानिक लोकांची चौकशी करण्यात आली. एनआयए या प्रकरणाचा तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. तपास संस्थेला काही संकेत मिळाले आहे. त्याच्या आधारावर काम केले जात आहे. लवकरच काही सकारात्मक गोष्टी समोर येतील, असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुरक्षा एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहेलगाममधील सुरक्षा एक चूक आहे. निष्काळजीपणा किंवा समजुतीचा अभाव आहे. त्या ठिकाणी सुरक्षेत हलगर्जीपणा झाला आहे, हे निश्चित आहे. हल्ल्याच्या वेळी बैसरन खोऱ्यात जम्मू-काश्मीरचा कोणताही पोलिस किंवा सीआरपीएफचा कोणताही जवान तैनात नव्हता. तर बैसरणच्या खाली सुमारे ५ किमी अंतरावर सीआरपीएफ कंपनीची चौकी आहे. पर्यटक या चौकीच्या समोरून दरीत पोहोचत होते. सीआरपीएफच्या तीन प्लाटूनपैकी दोन प्लाटून सामान्य गस्तीवर काम करतात आणि एक पोलीस स्टेशन अंतर्गत काम करते.
सुरुवातीला बैसरन खोऱ्यात इतका मोठा हल्ला झाला आहे, त्यावर सुरक्षा यंत्रणेचा विश्वास बसला नाही. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 45 मिनिटांनंतर पोलीस आणि सीआरपीएफ घटनास्थळी पोहचले. आता बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. ज्या भागावर सुरक्षा नाही, त्याठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी आणली जाणार आहे. संवेनशील ठिकाणी पर्यटकांना नो एन्ट्री करण्यात येणार आहे.