वेदनादायी, अनंतनागमधील काश्मीर पंडितांची कॉलनी रिकामी, हत्यांनंतर 90 टक्के काश्मिरी पंडितांनी रातोरात घरे सोडली, म्हणाले, आता संयम संपला..
अनंनाग आणि कुलगाममधील काही परिसरातील काश्मिरी पंडितांनी स्थानिक प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. खोरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काश्मिरी पंडित असलेल्या राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांचे आंदोलन सुरुच आहे.
श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात सातत्याने वाढत चाललेल्या काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandits)टार्गेट किलिंगमुळे दहशतीत असलेले पंडित आता खोरे (left from Ghati)सोडून निघून जात आहेत. पंतप्रधानांच्य़ा मदतीतून उभी राहिलेली अनंतनाग येथील मट्टनमधील काश्मिरी पंडितांच्या कॉलनीत भीषण शांतता पसरलेली आहे. इथे राहणाऱ्या एका काश्मिरी पंडितांने दिलेल्या माहितीनुसार मट्टन कॉलनीतील 90 टक्के काश्मिरी पंडितांनी (90 percent left)त्यांची घरे सोडली आहेत. लोकांच्या संयमाचा बांध आता तुटला आहे. त्यामुळे रात्रीतून घरे सोडत काश्मिरी पंड़ितांनी पलायन केले आहे. ही कॉलनी पंतप्रधानांच्या पॅकेजच्या योजनेंतर्गत तयार करण्यात आली होती. इथे काश्मिरी पंडित समुदायातील सरकारी कर्मचारी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून खोऱ्यात सुरु असलेल्या हत्यांच्या सत्रामुळे अनेकांनी कॉलनीतील घरे सोडून, इतर गावी प्रस्थान केले आहे. परिस्थिती सुधारली तरच ते परततील अशी आशा आहे.
A second #KashmiriPandit exodus is in progress. @PMOIndia is alone responsible for this. Mistakes of 1989 are being repeated by his govt. Political leaders of valley have no levers & left with no political legitimacy. Modi govt is busy promoting movies 1/2 https://t.co/obkazviyAw
हे सुद्धा वाचा— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 2, 2022
खोरे सोडून जाण्यासाठी प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी
दुसरीकडे अनंनाग आणि कुलगाममधील काही परिसरातील काश्मिरी पंडितांनी स्थानिक प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. खोरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काश्मिरी पंडित असलेल्या राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांचे आंदोलन सुरुच आहे. जोपर्यंत सुरक्षेची योग्य उपाययोजना होत नाही तोपर्यंत पडितांनी या ठिकाणाहून हलवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याचा सरकारचा निर्णय
टार्गेट किलिंगची वाढती व्याप्ती आणि धोका लक्षात घेता, काश्मीरात येत असलेल्या प्रवाशांना आणि जम्मू परिसरातील इतर क्रमचाऱ्यांना ६ जूनपर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल, असा निर्णय जम्मू काश्मीर सरकारने घेतला आहे. सगळअयांना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जम्मूत मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, टार्गेट करुन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात येते आहे.
टार्गेट किलिंगमुळे हादरले खोरे, 22 दिवसांत ९9 जणांची हत्या
काश्मीरमध्ये यावर्षी दहशतवादी हल्ल्यात 20 नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. यातील9 हत्या गेल्या 22 दिवसांतील आहेत. यात 5 हिंदू आणि 3 सैन्यदलातील कर्मचारी आहेत. हे जवान सुट्टीवर घरी परलेले असताना त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांनी एका टीव्ही एक्टरचीही हत्या केली आहे. गुरुवारी स्थानिक दहशतवादी संघटना असलेल्या काश्मनीर फ्रीडम फायटर या संस्थेने प्रसिद्धीपत्रक जारी करत, सगळ्यांना असेच परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे.
1990 मध्ये खोऱ्यातून सर्वाधिक पंडितांचे पलायन
1990 साली खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे सर्वाधिक पलायन झाले होते. गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, 1990 मध्ये 219 काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पंडितांचे पलायन सुरु झाले. एका अनुमानानुसार 1 लाख 20हजार काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून त्यावेळी पलायन केले होते.