Pakistan Claim On India : पाकिस्तान होणार ‘इंडिया’! कोणी केला दावा

Pakistan Claim On India : मथळावाचून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण दक्षिण आशियातील एका विश्वसनीय संस्थेने हे वृत्त दिल्यापासून खळबळ माजली आहे. केंद्र सरकारने भारत नाव अधिकृत केले तर केवळ भारतातच नाही तर जगभर त्याचे परिणाम दिसून येतील. काय केलाय या वृत्तात दावा?

Pakistan Claim On India : पाकिस्तान होणार 'इंडिया'! कोणी केला दावा
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 8:38 AM

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : G-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताच्या राष्ट्रपतींचा उल्लेख President of India ऐवजी President of Bharat असा करण्यात आला. तेव्हापासून देशाचे अधिकृत नाव भारत करण्याच्या सरकार दरबारी हालचाली सुरु असल्याच्या चर्चांना जोर आला. अर्थात यावर विरोधकांपासून सर्वांनीच हल्लाबोल केला. या मुद्दावरुन राजकारण तापले आहे. डिबेट शोमध्ये दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत. दरम्यान भारताच्या राज्यघटनेतच इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख असल्याने त्यासाठी केंद्र सरकारला (Central Government) विशेष काही वेगळं करण्याची गरज पडणार नाही, असा काही घटना तज्ज्ञांचा व्होरा आहे. भारत (Bharat) नावावरुन देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय मंचावर पण पडसाद उमटत आहेत. आता दक्षिण आशियातील एका संस्थेच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तान (Pakistan) इंडिया (India) या शब्दावर दावा सांगू शकतो, असा दावा या संस्थेने केला आहे, नेमकं काय आहे हे प्रकरण?

काय आहे दावा

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, जर इंडिया नावाऐवजी भारत या नावाला अधिकृत दर्जा मिळाला तर अनेक गोष्टी घडू शकतात. त्यानुसार, संयुक्त राष्ट्रात इंडिया नाव रद्दबातल ठरेल. त्याऐवजी भारत हे अधिकृत नाव समोर येईल. अशावेळी पाकिस्तान इंडिया नावावर दावा सांगू शकतो. पाकिस्तानचा इंडिया या शब्दासाठी अनेक दिवसांपासून खटाटोप सुरु आहे, हे अनेकांना माहिती नाही. त्यामागे एक ठोस कारण आहे. इंडिया हे नाव सिंधू संस्कृतीचे प्रतिक आहे. सध्याचा पाकिस्तानमध्येच हे क्षेत्र असल्याने सांस्कृतिक आधारावर ओळख दाखविण्यासाठी पाकिस्तान इंडिया नावावर दावा सांगणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या अग्रगण्य संस्थेचा पण दावा

South Asia Index Report ही दक्षिण आशियातील अग्रगण्य संस्था आहे. त्यांनी ट्विटर-एक्स हँडलवर हा दावा केला आहे. त्यानुसार, संयुक्त राष्ट्रात इंडिया या शब्द रद्दबातल झाला आणि अधिकृतपणे भारत या नावावर शिक्कामोर्तब झाले तर पाकिस्तान इंडिया या शब्दावर दावा सांगू शकतो.

मोहम्मद अली जिना इंडिया नावावर आक्षेप

साऊथ आशिया इंडेक्सच्या दाव्यानुसार, भारताने इंडिया नावावर दावा सांगितल्यावर त्याला विरोध झाला होता. पाकिस्तानचे संस्थापक आणि तत्कालीन पंतप्रधान, कायदे आझम मोहम्मद अली जिना यांनी इंडिया नावाला विरोध केला होता. त्यांना इंडियावर हक्क सांगायचा होता. पण भारताने इंडिया नाव स्वीकारले होते. भारताने इंडिया ऐवजी हिंदुस्थान अथवा भारत हे नाव घ्यावे, असे त्यांनी सुचवले होते.

आमंत्रण पण नाकारले

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर एका प्रदर्शनीसाठी मोहम्मद अली जिना यांना आमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रण पत्रिकेवर इंडिया हा शब्द होता. त्यानाराजीने जिना यांनी प्रदर्शनीला भेट देण्यास नकार दिला. रागा रागात जिना यांनी भारताचे शेवटचे गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन यांना पत्र लिहिले. त्यात इंडिया शब्दावरील भारताच्या दाव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....