AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asaduddin Owaisi | पुन्हा एकदा ओवैसींसमोर त्यांच्या सभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’, त्यांनी काय केलं?

Asaduddin Owaisi | असुदुद्दीन ओवैसीसमोर हे घडल्यानंतर त्यांनी काय केलं?. ओवैसींसमोर अशी घोषणाबाजी होण्याची ही पहिली वेळ नाहीय. अनेकदा ओवैसी यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्मण झालाय. आता पुन्हा एकदा भरसभेत ओवैसीसमोर हा प्रकार घडला.

Asaduddin Owaisi | पुन्हा एकदा ओवैसींसमोर त्यांच्या सभेत 'पाकिस्तान जिंदाबाद', त्यांनी काय केलं?
asaduddin owaisiImage Credit source: twitter
| Updated on: Aug 31, 2023 | 7:50 AM
Share

डुमरी : झारखंडच्या डुमरीमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्या ठिकाणी AIMIM ने आपला उमेदवार उभा केला आहे. अब्दुल मोबिन रिजवी यांना AIMIM तिकिट दिलं आहे. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांची बुधवारी एक जनसभा झाली. असुदुद्दीन ओवैसी जनसभेला संबोधित करत होते. त्यावेळी जनसभा ऐकायला आलेल्या काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या घोषणा ऐकून ओवैसींनी त्यांना टोकलं. त्यांच्यावर ओरडले. ‘तुम्ही शांत बसा व मी जे म्हणतोय ते ऐका’ असं असुदुद्दीन ओवैसी घोषणा देणाऱ्यांना म्हणाले.

ओवैसी यांच्या सभेतील आपत्तीजनक घोषणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या घोषणा कोणी दिल्या? त्यांना शोधून कारवाई करण्यासाठी डुमरी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. ओवैसी यांच्या सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जाणं, हे अत्यंत दुर्देवी आणि लज्जास्पद असल्याच भाजपाने म्हटलं आहे. “सभेत आपत्तीजनक घोषणा देऊन सात तास उलटले, मात्र तरीही अजून जिल्हा प्रशासनाने कुठलीही प्राथमिक तक्रार दाखल केलेली नाही. त्यांना अटक झालेली नाही. हे खेदजनक आहे” असं झारखंड भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शाहदेव यांनी म्हटलं आहे.

भाजपाने काय म्हटलय?

“झारखंड सरकारने आरोपींवर कठोर कारवाई करावी. अशा लोकांना शोधून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची गरज आहे” असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शाहदेव यांनी म्हटलं आहे. गिरिडीह एसपी दीपक शर्मा आणि डुमरी एसडीएम शहजाद व्हायरल व्हिडिओचा तपास करत आहेत. अज्ञात आरोपींविरोधात देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात येईल, असं म्हटलं जातय. ओवैसीसमोर हे पहिल्यांदा घडलय का?

याआधी मागच्यावर्षी 2022 मध्ये मांडर पोटनिवडणुकीच्यावेळी AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी रांची एयरपोर्टवर आले होते. त्यावेळी विमानतळावर उपस्थित त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. ओवैसी झारखंडमध्ये आल्यानंतर अशा प्रकारची घोषणाबाजी होत आहे. त्यामुळे AIMIM च निवडणुकीत नुकसान होऊ शकतं. ओवैसींनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.