Seema Haider : सीमा हैदर हिचं नशिब पालटलं, एनडीएतील या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
पाकिस्तानातून अनधिकृतपणे भारतात आलेल्या सीमा हैदर हिच्याबाबत रोज नवीन बातम्या समोर येत आहेत. आता तिला लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे, आश्चर्य व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानातून अनधिकृतपणे भारतात आलेल्या सीमा हैदर हिच्याबाबत रोज काही ना काही बातम्या समोर येत आहे. कधी ती आयएसआय एजंट असल्याचं सांगितलं जातं. तर कधी सीमा आणि सचिन यांच्यात बिनसल्याचं सांगितलं जातं. आता तर ती लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या बातमीची जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे ती अपक्ष निवडणूक लढवणार की एखाद्या पक्षाकडून याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. तर सीमा हैदर हिला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे ही ऑफर सीमा हैदर हीने स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे.
आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी सांगितलं की, “सीमा हैदर हिला पक्षाकडून ऑफर देण्यात आली आहे. सीमाला महिला संघटनेचं अध्यक्षपद सोपवलं जाऊ शकते. तिचा आत्मविश्वास चांगला आहे. त्यामुळे पक्षाचं प्रवक्तेपदी दिलं जाऊ शकतं. पण अजून तपास यंत्रणांकडून क्लिन मिळालेली नाही. हा निर्णय येतात जाहीरपणे नियुक्ती केली जाईल.”
“तिच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. तिला तपास यंत्रणांकडून क्लिन मिळाल्यानंतर आरपीआयकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवू. 2024 लोकसभा निवडणूक लढवू शकते. फक्त तिला भारताचं नागरिकत्व मिळालं पाहीजे. “, असंही मासूम किशोर यांनी पुढे सांगितलं. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले राज्यसभा खासदार आहेत. केंद्र सरकारमध्ये आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
सीमा हैदर हिला यापूर्वी चित्रपटात काम करण्याची ऑफर देण्यात आली आहे. फिल्म डायरेक्टर जयंत सिन्हा आणि भारत सिंह यांनी सीमाचं ऑडिशन घेतलं होतं. दुसरीकडे फिल्म निर्माता अमित जानी यांनीही तिची भेट घेतली आहे. माहितीनुसार, पाकिस्तानातून आलेल्या सीमा चित्रपटात रॉ एजेंटची भूमिका बजवणआर आहे. हा एक मर्डर स्टोरी चित्रपट आहे.
सीमा हैदर हिचं वय 19 वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे. सीमा ही पाकिस्तानची नागरिक असून तिला चार मुलं आहेत. पब्जी गेम खेळताना तिला सचिन मीणासोबत प्रेम झालं आणि त्यांनी नेपाळमध्ये लग्न केलं. पण सीमा अनधिकृतपणे भारतात आल्याने मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.