भारत अमेरिकेपर्यंत रेंज असणारे सुर्या मिसाईल बनवणार? पाकचा दावा काय ?

भारताकडे सध्या सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्र अग्नि-5 असून त्याची क्षमता 5,500 ते 6,000 किलोमीटर इतकी आहे. हे क्षेपणास्र संपूर्ण आशिया आणि युरोपातील अनेक ठिकाणांना लक्ष्य करु शकते. चीनच्या वाढत्या हालचालींमुळे हे क्षेपणास्र भारताने तयार केलेले आहे.

भारत अमेरिकेपर्यंत रेंज असणारे सुर्या मिसाईल बनवणार? पाकचा दावा काय ?
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 6:20 PM

भारताच्या क्षेपणास्र क्षमतेचा जगात दबदबा आहे. भारताने अनेक स्वदेशी आंतरखंडीय क्षेपणास्राची निर्मिती केलेली असून त्याच्या रेंज आशिया आणि युरोपातील अनेक देश येतात. आता भारत एक असे क्षेपणास्र विकसित करीत आहे जे अमेरिका ते ब्रिटनपर्यंतचे टार्गेट लक्ष्य करु शकेल असा दावा पाकिस्तानच्या संरक्षण तज्ज्ञाने केल्याने खळबळ उडाली आहे. इस्लामाबाद येथील कायद-ए- आझम युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ पॉलिटीक्स एण्ड इंटरनॅशनल रिलेशन्समधील तज्ज्ञ प्रोफेसर जफर नवाझ जसपाल यांनी भारत ‘सुर्या’ नावाचे आंतर खंडीय क्षेपणास्र ( ICBM ) विकसित करीत असल्याचे म्हटले आहे.

सुर्या मिसाईलची रेंज किती ?

भारताच्या प्रस्तावित सुर्या ICBM ची रेंज 10,000 ते 12,000 किलोमीटर इतकी असणार आहे असे वर्ल्ड इको न्यूजशी बोलताना प्रोफेसर जसपाल यांनी दावा केला आहे. याचा अर्थ अमेरिका देखील भारताच्या क्षेपणास्राच्या रेंजमध्ये येणार आहे.अशा प्रकारच्या क्षेपणास्राचा विकास इस्लामाबाद पेक्षा जास्त वॉशिंग्टन, युरोप आणि रशिया यांच्यासाठी चिंतेचा असला पाहीजे. कारण भारताकडे सध्या असलेली क्षेपणास्रं पाकिस्तानात कोठेही हल्ला करण्याच्या क्षमतेची आहेत.

सुर्या क्षेपणास्रवर भारताचे काय म्हणणे ?

भारताच्या डीआरडीओने सातत्याने या बाबीला स्पष्ट शब्दात नाकारले आहे. भारत कोणत्याही सुर्या ICBM प्रोजेक्टवर काम करीत नाही. भारताचा फोकस आपल्या रणनीला आवश्यकतेनुसारच संरक्षणात्मक क्षमता वाढविण्यावर असल्याचे डीआडीओने स्पष्ट केले आहे. सध्याच्या काळात अग्नि क्षेपणास्राच्या पल्ल्या पेक्षा जास्त अंतरावर मारा करणाऱ्या कोणत्या आयसीबीएम प्रोजेक्ट विचार नसल्याचे डीआरडीओने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

भारताकडे अग्नि – V क्षेपणास्र

भारताकडे असलेल्या शस्रास्र भांडारात अग्नि – 5 सर्वात प्रगत क्षेपणास्र आहे. या क्षेपणास्राची रेंज 5,500 ते 6,000 किलोमीटर इतकी आहे. हे मिसाईल संपूर्ण आशिया आणि युरोपर्यंतच्या कोणत्याही भागाला टार्गेट करण्याच्या क्षमतेचे आहे. अग्नि -5 च्या योजनेला भारताची प्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी तयार केले होते. याला खास करुन चीनच्या वाढत्या सामर्थ्यानंतर भारताने तयार केलेले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.