कोलकाता पोलिसांचा खळबळजनक दावा, भाजप नेत्या पामेला गोस्वामी यांना ड्रग्ज घेण्याची सवय

कोकेन ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी पामेला यांना कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) अटक केल्यानंतर आता खळबळजनक माहिती समोर येत आहे. (Pamela Goswami drug Kolkata police)

कोलकाता पोलिसांचा खळबळजनक दावा, भाजप नेत्या पामेला गोस्वामी यांना ड्रग्ज घेण्याची सवय
पामेला गोस्वामी
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 2:49 PM

कोलकाता : भाजपची विंग युवा मोर्चाशी संबंधित असलेल्या पामेला गोस्वामी (Pamela Goswami) आणि प्रबीर कुमार दे (Prabir kumar Dey) यांना अटक झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. कोकेन ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी पामेला यांना कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) अटक केल्यानंतर आता खळबळजनक माहिती समोर येत आहे. भाजप नेत्या पामेला गोस्वामी यांना ड्रग्ज घेण्याच सवय असल्याचा दावा कोलकाता पोलिसांनी केला आहे. पामेला यांच्या वडिलांकडून तशी माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Pamela Goswami was drug addicted claim Kolkata police)

गोस्वामी यांना ड्रग्ज घेण्याची सवय 

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे पामेला यांना त्यांच्या एका मित्रामुळे त्यांना ड्रग्ज घेण्याची सवय लागली होती. पामेला यांना ड़्रग्ज घेण्याची सवय असल्यामुळे पामेला यांच्या वडिलांनी त्यांची काळजी घेण्याचे सांगितल्याचेही कोलकाता पोलिसांनी सांगितले आहे. पामेला गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. पामेला यांना या प्रकरणात मुद्दामहून गोवले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर दुसरीकडे पामेला गोस्वामी यांनी त्यांच्या पक्षातीलच भाजप खासदार राकेश सिंह (Rakesh Singh) यांच्यावर आरोप केले आहेत. राकेश सिंह यांनीच ड्रग्जच्या प्रकरणात फसवल्याचा आरोप पामेला गोस्वामी यांनी केला आहे. मात्र, भाजप खासदार राकेश सिंह यांनी पामेला यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे कारस्थान तृणमूल काँग्रेसने केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी कारवाई कशी केली?

पामेला गोस्वामी 20 फेब्रुवारी रोजी आपल्या कारमधून कोकीन हे ड्रग्ज घेऊन जात होती. पोलिसांना याबाबत खबर मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी कारवाई केली. या कारवाईत गोस्वामी रंगेहाथ पकडली गेली. पोलिसांनी कोलकाताच्या न्यू अलीपूर भागात तिची गाडी अडवली. यावेळी गाडीत तिच्यासोबत एक सुरक्षा रक्षकही होता. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीत लाखो रुपयांचे ड्रग्ज मिळाले.

इतर बातम्या  :

गाडीचा FASTag स्कॅन न झाल्यास काय कराल? ही झेरॉक्स जवळ ठेवा अन् फुकट प्रवास करा

नागालँडमध्ये इतिहास घडला, 58 वर्षांमध्ये विधानसभेत पहिल्यांदा वाजली राष्ट्रगीताची धून

बाप रे! आता माणसांनाही बर्ड फ्लूची लागण; रशियात H5N8 स्ट्रेनची सात जणांना लागण

(Pamela Goswami was drug addicted claim Kolkata police)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.