Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parambir Singh Letter : ‘ठाकरे सरकारनं नैतिक अधिकार गमावला,’ केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Parambir Singh Letter : 'ठाकरे सरकारनं नैतिक अधिकार गमावला,' केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल
परमबीर सिंग यांच्या पत्रावरुन रविशंकर प्रसाद यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 3:17 PM

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय पातळीवरही हे प्रकरण चांगलंच गाजत आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकारला आता नैतिक अधिकार उरला नसल्याचा घणाघात प्रसाद यांनी केलाय.(Ravi Shankar Prasad criticizes CM Uddhav Thackeray and Sharad Pawar after Parambir Singh’s allegations against Anil Deshmukh)

‘ठाकरे सरकारनं नैतिक अधिकार गमावला’

“महाराष्ट्रात वसुलीची महाआघाडी आहे. हे प्रकरण केवळ एका मंत्र्यांचं नाही, तर उद्धव ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे. या सरकारनं नैतिक अधिकार गमावला आहे”, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केलाय. प्रसाद यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केलीय. उद्धव ठाकरे यांची शांती काय सांगते? शरद पवार यांच्या शांत राहण्यामुळेही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विधानसभा आणि बाहेरही मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे यांना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचंही प्रसाद यांनी म्हटलंय.

सचिन वाझे हे अस्टिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. यात मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्तांची भूमिकाही असू शकते, अशी शंका प्रसाद यांनी उपस्थित केली आहे.

‘सचिन वाझेकडून अजून कोणती घाणेरडी कामं करुन घेतली?’

गृहमंत्री अनिल देशमुख सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करायला सांगतात. मग सचिन वाझेकडून अजून कोणती घाणेरडी कामं केली गेली? असा सवाल प्रसाद यांनी विचारलाय. त्याचबरोबर शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत, असंही प्रसाद म्हणाले. सचिन वाझे अनेक वर्षे निलंबित होता. कोरोना काळात त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आलं. आता शिवसेना सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रसाद यांनी केलाय.

शरद पवारांनी मौन सोडलं

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी ज्युलिओ रिबेरो सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राजीनामा घ्यायचा की नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तेच याबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले.

संबंधित बातमी :

फडणवीस आणि परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेल्यावर महाराष्ट्रात लेटर बॉम्ब: शरद पवार

गृहमंत्री अनिल देशमुखांचीही चौकशी होणार का?; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल

Ravi Shankar Prasad criticizes CM Uddhav Thackeray and Sharad Pawar after Parambir Singh’s allegations against Anil Deshmukh

संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....