Parliament Attack | रंगीत फटाक्यांची जबाबदारी अमोल शिंदे याच्यावर, अशी केली संसदेची रेकी

Parliament Attack | संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचे महाराष्ट्र कनेक्शन उघडं झाले आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे याला संसद परिसरात ताब्यात घेण्यात आले. त्याला ताब्यात घेण्यापूर्वी त्याने स्मोक क्रॅकर्सचा वापर केला होता. असाच वापर लोकसभा सभागृहात त्याच्या साथीदाराने केला होता. हे रंगीत फटाके अमोल शिंदे यानेच आणल्याचे आता निष्पन्न झाले आहे.

Parliament Attack | रंगीत फटाक्यांची जबाबदारी अमोल शिंदे याच्यावर, अशी केली संसदेची रेकी
Parliament Security Breach case
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 11:16 AM

संदिप राजगोळकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : बुधवारी, 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेत घुसखोरी झाली. चार तरुणांनी संसद परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी कोणाला इजा पोहचवली नाही. पण लक्ष वेधण्यासाठी त्यांनी कलर फटाके आणि घोषणांचा वापर केला. लोकसभा सभागृहात आणि संसद परिसरात पिवळ्या रंग पसरला. या प्रकरणात लातूरमधील चाकूर तालुक्यातील झरी गावातील आहे. पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवल्यानंतर या सर्व कटाचा पर्दाफाश झाला. अमोल शिंदे यानेच हे रंगीत फटाके आणल्याचे समोर आले. घुसखोरीचा हा कट अनेक दिवसांपासून शिजत असल्याचे समोर आले आहे.

दीड वर्षांपूर्वी झाली बैठक

संसदेत घुसखोरी करुन गोंधळ माजविण्याचा प्रयत्न देशातील विविध भागातील तरुणांनी दीड वर्षांपूर्वीच आखला होता. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले. भगतस‍िंग फॅन क्‍लब त्यांनी तयार केला. दीड वर्षांपूर्वी काय करायचे यासंबंधी म्हैसूरमध्ये त्यांनी एक बैठक घेतली. नऊ महिन्यांनी पुन्हा बैठक घेतली. त्यात संसदेत घुसखोरी करुन अराजकता पसरवण्याचा कट रचला.

हे सुद्धा वाचा

अगोदर केली रेकी

या कटात सागर शर्मा, मनोरंजन, अमोल शिंदे, नीलम, ललित झा यांच्यासह काही तरुणांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तपास सुरु आहे. त्यानुसार, मार्च महिन्यात या सर्वांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी संसद परिसराची रेकी केली. मनोरंजन याने पास काढून ही कामगिरी केली होती. आरोपी हे 12 डिसेंबर रोजी रात्री गुरुग्राममध्ये विशाल शर्मा याच्या घरी थांबले. याप्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा असल्याचे तपासात समोर येत आहे. हा प्रकार सुरु असताना संसदेच्या बाहेर अमोल शिंदे आणि नीलमचा व्हिडिओ तयार करण्याचे काम ललितवर होते. त्यानं व्हिडिओ तयार करुन तो लागलीच इन्स्टाग्रामवर अपलोड केला. सर्वच आरोपींचे मोबाईल त्याच्याकडे आहेत.

रंगीत फटाके महाराष्ट्रातून

याप्रकरणात लोकसभा सभागृहात आणि संसद परिसरात स्मोक क्रॅकर्सचा वापर करण्यात आला. त्यामुळे पिवळा धूर झाला. हे कलर फटाके अमोल शिंदे याने महाराष्ट्रातून आणल्याचे तपासात समोर आले आहे. मनोरंजन याला माहीत होतं की बूटांची तपासणी केली जात नाही म्हणून त्यांन फटाके बूटांमधून नेले. राजधानी दिल्लीतल्या इंडिया गेट परिसरात फटाके वाटले गेले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.