Parliament Winter Session | संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द, दिल्लीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे निर्णय

नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यालयानं दिली आहे. | Parliament Winter Session

Parliament Winter Session | संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द, दिल्लीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे निर्णय
Parliament winter session
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 12:17 PM

नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) यावेळी होणार नाही. दिल्लीत कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार होते. परंतु, यावेळी कोरोना संक्रमणामुळे अधिवेशन होणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबतच हिवाळी अधिवेशन होणार आहे. जानेवारी,फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात होणार असल्याची माहिती संसदीय संसदीय कार्यालयाकडून देण्यात आलीय. (Parliament may skip Winter Session and club with budget session)

हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान घेण्यात येते. मात्र, कोरोनामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. संसंदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबतचं हिवाळी अधिवेशन घेण्यात येईल.

सप्टेंबरमध्ये संसेदेचे पावसाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत सदस्यांची आसनव्यवस्था लोकसभा आणि राज्यसभा या सदनामध्ये करण्यात आली होती. मात्र, यावेळी अनेक संसद सदस्य आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.

सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये 40 जण कोरोना पॉझिटिव्ह झआले होते. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीत झाले होते.

कन्याकुमारीचे खासदार एच.वसंताकुमार, तिरुपतीचे खासदार बाली दूर्ग प्रसाद, राज्यसभेचे खासदार अशोक गस्ती यांचे कोरोनामुळं निधन झाले आहे.(Parliament may skip Winter Session and club with budget session)

दिल्लीतील कोरोना स्थिती

दिल्लीत कोरोना विषाणूचा संसर्ग भीतिदायक आहे. रविवारी दिल्लीत कोरोनाचे 6,746 नवीन रुग्ण आढळले आणि 121 जणांचा मृत्यू झाला तर 6,154 लोक बरे झाले. शनिवारी दिल्लीत कोविडची 5879 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 111 जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 21 नोव्हेंबर रोजी व्यापा-यांना आश्वासन दिले की, बाजार बंद करण्याचा सरकारचा हेतू नाही. दिल्ली सरकारने निर्णय घेतला होता की, ज्या बाजारांमध्ये कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले जात आहे, त्या बाजारांना तात्पुरते सीलबंद केले जाईल.

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नागपूर येथे होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला. यावर भाजपनं टीका केली आहे.

संबंधित बातम्या :

दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप, सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी!

दिल्लीत मोठी कारवाई, कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना मोडल्यानं 7 दिवसांसाठी मार्केट बंद

Parliament Monsoon Session | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

(Parliament may skip Winter Session and club with budget session)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.