माय लॉर्ड, माझी बायको मला परत द्या हो… कोर्टात युवकाचा हंबरडा, काय घडलं?

माय लॉर्ड, माझी बायको मला परत द्या हो... अशी विनंती करत एका तरूणाने न्यायालयात धाव घेतली. बिहारमधील या तरूणाने पाटणा उच्च न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली. माझी पत्नी मला परत द्या, अशी मागणी त्याने न्यायाधीशांकडे केली.

माय लॉर्ड, माझी बायको मला परत द्या हो... कोर्टात युवकाचा हंबरडा, काय घडलं?
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 11:29 AM

पाटणा| 18 जानेवारी 2024 : माय लॉर्ड, माझी बायको मला परत द्या हो… अशी विनंती करत एका तरूणाने न्यायालयात धाव घेतली. बिहारमधील या तरूणाने पाटणा उच्च न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली. माझी पत्नी मला परत द्या, अशी मागणी त्याने न्यायाधीशांकडे केली. त्याला आणि त्याच्या पत्नीला एकत्र राहायची इच्छा आहे. पण अल्पवयीन पत्नीचा ताबा पतीयाकडे देण्यास हायकोर्टाने नकार दिला. ती जोपर्यंत सज्ञान होत नाही, तोपर्यंत ती बालिका संगोपन केंद्रातच राहणार असल्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. त्या तरूणाला त्याच्या पत्नीचा ताबा काही मिळाला नाही, पण न्यायालयाने त्याच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी टाकली. नवजात बाळाच्या नावाने बँक खातं उघड आणि त्यात नियमितपणे मोठी रक्कम भरत रहा, असे निर्देश न्यायमूर्ती पीबी बजंत्री आणि न्यायमूर्ती रमेशचंद मालवीय यांच्या खंडपीठाने दिले.

‘सध्याच्या प्रकरणात, अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांसोबत जाण्यास विशेष नकार दिला आहे. त्यामुळे तिचे शासकीय बालिका गृहात राहणे तिच्या आणि तिच्या मुलाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे असे म्हणता येणार नाही. तिची तब्येत सुधारेपर्यंत तिला सोडण्याचे निर्देश दिले जाऊ शकत नाहीत. ती सज्ञान झाल्यानंतर तिचा ताबा पतीकडे देण्यात यावा.” असे न्यायालयाने नमूद केले.

सरकारने केली पतीची पोलखोल

23 वर्षीय पतीने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर न्यायालय विचार करत होते. ज्यामध्ये सरकारी बालिका देखभाल गृहातून पत्नीची सुटका करण्याचे निर्देश मागितले होते. त्या बालिकेने असा दावा केला होता की ती प्रौढ आहे आणि तिने स्वतःच्या इच्छेने त्या तरूणाशी लग्न केले आहे. मुलीच्या वडिलांनी याचिकाकर्त्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात त्याला जामीन मिळाला आहे, असेही कोर्टाला सांगण्यात आले की. या युक्तिवादाचे खंडन करताना, राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की मुलगी अल्पवयीन असल्याचे आढळून आले आणि हे बालविवाहाचे प्रकरण आहे, जे कायद्यानुसार प्रतिबंधित आहे.

पित्यासोबत रहायची मुलीची इच्छा नाही

गेल्या महिन्यात त्या अल्पवयीन मुलीला न्यायालयात सादर करण्यात आले तेव्हा तिने हे कबूल केले की तिने स्वत:च्या मर्जीने हे लग्न केले आणि आपण सज्ञान आहोत, असा दावाही तिने केला. मला माझ्या पतीसोबतच रहायचे आहे, असे सांगत त्या मुलीने वडिलांसोबत जाण्यासही नकार दिला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.