Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर, महागाईच्याविरोधात मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय

देशवासियांना लवकरच मोठा दिसाला देण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकार महत्वाचा निर्णय घेणार आहे. लवकरच इंधनाचे दर कमी होणार आहेत.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर, महागाईच्याविरोधात मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय
पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णयImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 12:04 AM

नवी दिल्ली : देशवासियांना लवकरच मोठा दिसाला देण्याच्या तयारीत केंद्र सरकार (Central Government) आहे. इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकार महत्वाचा निर्णय घेणार आहे. लवकरच इंधनाचे दर (Fuel Price) कमी होणार आहेत. तशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी केलीय. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे महागाईच्या झळा सर्वसामान्यांना सोसाव्या लागत होत्या. आता केंद्राच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिक आणि गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारचा नेमका निर्णय काय?

पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 6 रुपयाने कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. तशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. त्यामुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर घरगुती गॅससाठीही केंद्र सरकारकडून 200 सबसिडीची घोषणा करण्यात आली आहे.

पेट्रोलचे आजचे दर (महत्वाची शहरे)

मुंबई – 120.51 पुणे – 120.72 नाशिक – 120.31 नागपूर – 120.73 परभणी – 122.03 औरंगाबाद – 120.79 कोल्हापूर – 120.81 रत्नागिरी – 121.80

पेट्रोल उत्पादन शुल्क कमी केल्यानंतरचे संभाव्य दर (महत्वाची शहरे)

मुंबई – 111.01 पुणे – 111.22 नाशिक – 110.81 नागपूर – 111.23 परभणी – 112.53 औरंगाबाद – 111.29 कोल्हापूर – 111.31 रत्नागिरी – 112.03

घरगुती गॅसबाबतही सरकारचा मोठा निर्णय

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति गॅस सिलिंडर प्रमाणे वर्षाला 12 सिलिंडरला सबसिडी मिळणार आहे. तशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलीय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ही घोषणा केली आहे. आम्ही पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 9 कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति गॅस सिलिंडर (12 सिलिंडर) सबसिडी दिली जाणार. यामुळे आमच्या माता-भगिनींना मदत मिळेल, असं सीतारामण म्हणाल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.