स्वतः पेट्रोलियम मंत्र्यांनीही मान्य केलं, 7 वर्षात घरगुती गॅसची किंमत दुप्पट, पेट्रोल-डिझेलवरील करात 459 टक्के वाढ

पेट्रोल आणि डिझेलसोबतच (Petrol-Diesel Price) एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय.

स्वतः पेट्रोलियम मंत्र्यांनीही मान्य केलं, 7 वर्षात घरगुती गॅसची किंमत दुप्पट, पेट्रोल-डिझेलवरील करात 459 टक्के वाढ
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 12:40 AM

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलसोबतच (Petrol-Diesel Price) एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “मागील 7 वर्षांमध्ये घरगुती गॅसची (LPG) किंमत दुप्पट वाढून 819 रुपये झालीय. तसेच पेट्रोल आणि डिझेलवर करवाढीने करसंकलनात 459 टक्क्यांची वाढ झालीय.” लोकसभेत वाढत्या इंधनदरावर उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान बोलत होते. 1 मार्च 2014 रोजी 14.2 किलोग्रॅम LPG गॅस सिलेंडरची किंमत 410.5 रुपये होती. या महिन्यात सिलेंडरची किंमत 819 रुपये झालीय (Petroleum Minister Dharmendra Pradhan on Petrol-Diesel and LPG Gas Cylinder Price).

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बाजारावर अवलंबून आहेत. 26 जून 2010 आणि 19 ऑक्टोबर 2014 नंतर सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या (OMCs) आंतरराष्ट्रीय किंमत, एक्सचेंज रेट, टॅक्स स्ट्रक्चर, इनलँड फ्रेट आणि इतर खर्चाच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचा दर ठरवतात.” मागील काही वर्षांमध्ये घरगुती गॅससोबतच रॉकेलवरील (केरोसिन) अनुदान (सबसिडी) बंद करण्यात आलीय. मागील काही महिन्यांमध्ये घरगुती अनुदानित LPG च्या किमतीत वाढ करण्यात आलीय. डिसेंबर 2020 मध्ये गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपये होती आता त्याची किंमत 819 रुपये झालीय.

रॉकेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ

रेशनच्या दुकानात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून (PDS) गरिबांना उपलब्ध होणाऱ्या रॉकेलची (केरोसिन – Kerosene) किंमत मार्च 2014 मध्ये 14.96 रुपये प्रति लिटर होती. तिच किंमत आज 35.35 रुपये झालीय. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देशभरात उच्चांकी स्तरावर आहेत. दिल्लीत पेट्रोल दर 91.17 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 81.47 रुपये प्रति लिटर आहे.

केंद्र सरकारकडून किती करवसुली?

वर्तमान स्थितीत केंद्र सरकार पेट्रोलवर तब्बल 32.90 रुपये आणि डिझेलवर 31.80 रुपये प्रति लिटर एक्साईज ड्यूटी वसूल करते. 2018 मध्ये पेट्रोलवर 17.97 रुपये आणि डिझेलवर 13.83 रुपये प्रति लिटर एक्साईज ड्यूटी होती. पेट्रोलियम मंत्री म्हणाले, “नोव्हेंबर 2014 आणि जानेवारी 2016 दरम्यान सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर 9 वेळा एक्साईज ड्यूटी वाढवली. एकूण 15 महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर क्रमश: 11.77 रुपये आणि 13.47 रुपये प्रति लिटर वाढ झाली.”

हेही वाचा :

सौदीच्या तेल विहिरींवर हल्ले, पेट्रोल-डिझेल दरवाढीने होरपळणाऱ्या भारताला पुन्हा चटके

इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ शहरात 100 नवे चार्जिंग स्टेशन उभारणार, राज्य सरकारचा पुढाकार

गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, आज राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

व्हिडीओ पाहा :

Petroleum Minister Dharmendra Pradhan on Petrol-Diesel and LPG Gas Cylinder Price

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.