पदवीनंतर थेट करा PhD, पदव्युत्तर पदवीची गरज नाही, युजीसीचं नवं शैक्षणिक धोरण

पीएचडी करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदची बातमी आहे. आता पदव्युत्तर पदवी न घेता करता पीएचडी करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार तुम्हाला संशोधनासह पदवी घ्यायची असेल तर बारावीनंतरच्या चार वर्षांच्या पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट 'पीएचडी'साठी (Phd) प्रवेश मिळणे शक्य होणार आहे.

पदवीनंतर थेट करा PhD, पदव्युत्तर पदवीची गरज नाही, युजीसीचं नवं शैक्षणिक धोरण
university grants commissionImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 8:38 AM

पीएचडी करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदची बातमी आहे. आता पदव्युत्तर पदवी न घेता करता पीएचडी करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार तुम्हाला संशोधनासह पदवी (degree) घ्यायची असेल तर बारावीनंतरच्या (HSC)चार वर्षांच्या पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’साठी (Phd) प्रवेश मिळणे शक्य होणार आहे. यासाठी नियमांत बदल करण्यात येणार आहेत. याबाबतचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने (university grants commission) वेबसाइटवर प्रसिद्ध केला असून याबाबत सूचना 31 मार्चपर्यंत मागविल्या आहेत. बारावीनंतर चार वर्षांचे पदवी शिक्षण घेऊन संशोधन अथवा ऑनर्सची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’ला प्रवेश घेता येईल, असा प्रस्ताव ‘यूजीसी’ने आणलाय. त्यामुळे आता पीएचडीचे स्वप्न बाळगणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नेमका नियम काय?

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये 12वीनंतर पदवी शिक्षण घेताना पहिल्या वर्षात 40 ते 44 श्रेयांक मिळाल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्र घेऊन शिक्षण सोडू शकतो. तसेच पुढील वर्गात जाऊ शकतो. दुसऱ्या वर्षी 80 श्रेयांकासह शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पदविकाधारक होऊन शिक्षण सोडू शकतो. तिसऱ्या वर्षीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पदवीधर होतो. या वर्षात विद्यार्थ्याचा सीजीपीए 7.5 इतका असल्यास विद्यार्थी चौथ्या वर्षी अर्थात संशोधन पात्र ठरतो. पुढे संशोधनाचे शिक्षण पूर्ण झाले की विद्यार्थ्याला पदवी मिळून शकते.

आयोगाचा नवा मसुदा काय आहे?

विद्यापीठ अनुदा आयोगाने पीएचडी पदवीसाठी नवा मसुदा तयार केलाय. यामध्ये चार वर्षे ऑनर्स आणि संशोधनासह पदवीचा मसुदाही प्रसिद्ध झालाय. त्यानुसार 2022-23 या वर्षापासून 4 वर्षे पदवी शिक्षण देण्याची तयारी सुरू केली जाणार आहे. यानुसार चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना 160 ते 176 श्रेयांक असणं आवश्यक आहे. चार वर्षे शिक्षण घेऊन पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवी शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला एका वर्षात हे शिक्षण घेण्याचीही मुभा आहे. मात्र, तीन वर्षांनंतर पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षे पदव्युत्तर पदवी शिक्षण घ्यावे लागणार आहे. पदवी शिक्षणादरम्यान प्रत्येक श्रेयांकासाठी 45 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे. हा अभ्यासक्रम प्रात्यक्षिक, इंटर्नशिप, सेमिनार्स अशा पद्धतीने विभागला आहे. या निर्णयामुळे पीचडीचं स्वप्न बाळगणाऱ्यांना दिलासा मिळालाय.

इतर बातम्या

Madhya pradesh : दोन समाजात तुफान हाणामारी, घटनेत एकाचा मृत्यू, आरोपींच्या घरावर प्रशासनाचा बुलडोझर, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर, 14व्या शिखर संमेलनातही सहभाग घेणार

Punjab Cabinet: ‘मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे तात्काळ भरण्याचे आदेश; Bhagwant Mann यांचा मोठा निर्णय

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.