अंतराळातील 8 दिवसांचा मुक्काम 160 दिवसांवर, सुनीता विल्यम्सच्या त्या व्हायरल फोटोमुळे चिंता वाढली, प्रकृतीबाबत मोठी अपडेट

अंतराळवीर सुनीता विल्सम्स आणि त्यांचे सहकारी विल्यम्स बुच यांना स्पेस स्टेशनमध्ये जाऊन तब्बल सहा महिने झाले आहेत. मात्र अजूनही ते पृथ्वीवर परतू शकलेले नाहीत. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

अंतराळातील 8 दिवसांचा मुक्काम 160 दिवसांवर, सुनीता विल्यम्सच्या त्या व्हायरल फोटोमुळे चिंता वाढली, प्रकृतीबाबत मोठी अपडेट
सुनीता विल्यम्स
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 9:01 PM

अंतराळवीर सुनीता विल्सम्स आणि त्यांचे सहकारी विल्यम्स बुच यांना स्पेस स्टेशनमध्ये जाऊन तब्बल सहा महिने झाले आहेत. मात्र अजूनही ते पृथ्वीवर परतू शकलेले नाहीत. या इंटरनॅशनल स्पेस स्थानकाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी सुनीता विलम्स यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सुनीत विलम्स यांची तब्येत खूपच बारीक झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता या दोन्ही अंतराळवीरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोबतच नासाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार स्पेस स्टेशनमध्ये आता पाणी उपलब्ध नसल्यानं आपली लघवी आणि घामाचं रुपांतर पाण्यात करून ते पिण्याची वेळ या दोन अंतराळवीरांवर आली आहे. मात्र नासाकडून त्यांना पाण्याचा पुरवठा देखील केला जात नाहीये.

अंतराळ यानामध्ये झालेल्या काही तांत्रिक बिघाडामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच यांचा स्पेस स्टेशनमधील मुक्काम दिवसेंदिवस वाढतच आहे. सुरुवातीला ते अंतराळात फक्त आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते. मात्र आता त्याला तब्बल 160 दिवस झाले आहेत, ते अजूनही पृथ्वीवर परतू शकलेले नाहीत. ज्याचा त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. नासाकडून वारंवार स्पेस स्टेशनची अपडेट घेण्यात येत आहे. सुनीता विल्सम यांच्याकडे खाण्यासाठी सध्या झींगा कॉकटेल, पिज्जा आणि अशा अनेक पदार्थांचे पर्याय आहेत, मात्र त्यांना ताजे अन्न मिळू शकत नाहीये.

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्यांचा मुक्काम वाढत चालला आहे. अशा स्थितीमध्ये पाण्याच्या बचतीकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. त्यामुळे सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी लघवी आणि घामाचे पाण्यात रुपांतर करून ते पित आहेत. तसेच ज्या अन्नासाठी पाण्याची आवश्यक नाही असं अन्न खाण्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आल्या आहेत. 25 सप्टेंबरला एक फोटो व्हायर झाला होता, ज्यामध्ये सुनीत विल्यम्स आपल्या सहकाऱ्यांसोबत पिझ्झा खाताना दिसत आहे, मात्र त्यांची प्रकृती ही खूप रोडावली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.