उत्तर प्रदेशमधील प्रयागराजजवळी गंगा किनाऱ्यावर अनेक मृतदेह पुरलेल्या स्थितीत पाहून अनेकजण सुन्न झालेत. (Photo Credit : Reuters)
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच गंगा नदीत अनेक मृतदेह वाहून आल्यानंतर जगभरातून यावर टीका झाली.
गंगा नदीत आढळलेल्या अनेकांना कोरोना संसर्ग झालेला असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. (Photo Credit : Reuters)
आता या भागात गंगा किनारी राज्याच्या नैसर्गिक आपत्ती दलाच्या जवानांची तैनाती करण्यात आलीय. (Photo Credit : Reuters)
गंगा किनारी दफन करण्यात आलेल्या या मृतदेहांमध्ये कोरोना संसर्गित लोकांचाही समावेश असल्याचं बोललं जातंय.
त्यामुळे यातून कोरोना संसर्गाचा धोकाही निर्माण होऊ शकतो असं जाणकार सांगत आहे. (Photo Credit : Reuters)
याशिवाय उत्तर प्रदेश सरकारवर सातत्याने कोरोना रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी लपवल्याचाही आरोप होतोय. त्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं मोठं आव्हान सध्या उत्तर प्रदेश सरकारसमोर दिसतंय.